इंदापुरात दहा एकर शेतपिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:04 AM2021-08-23T04:04:26+5:302021-08-23T04:04:26+5:30
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा खुलताबाद : तालुक्यातील इंदापूर शिवारातील दहा एकर क्षेत्रातील मका, मूग, उडीद पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यामुळे आठ ...
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
खुलताबाद : तालुक्यातील इंदापूर शिवारातील दहा एकर क्षेत्रातील मका, मूग, उडीद पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यामुळे आठ ते दहा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या उपद्रवी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
इंदापूर येथील गटनंबर २०, २१मधील सुनील निकम, अजिनाथ गायकवाड व इतर शेतकऱ्यांचे मका, मूग व उडीद पिकाचे रानडुक्कर, हरिण आदी वन्यप्राण्यांनी अतोनात नुकसान केले आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वन विभागाने तातडीने पंचनामा करून या जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी अविराज निकम पाटील यांनी केली आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
फोटो कॅप्शन : खुलताबाद तालुक्यातील इंदापूर शिवारात वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांची उभी पिके फस्त करण्याचा सपाटा लावला आहे.
220821\1845-img-20210822-wa0036.jpg
खुलताबाद तालुक्यातील इंदापूर येथे वन्यप्राण्यांनी शेतक-यांची उभी पीके फस्त करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत