संपूर्ण ताकतीनिशी भाजपा मनपाची निवडणूक लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:31 AM2017-08-23T00:31:57+5:302017-08-23T00:31:57+5:30
आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, सोलापूर, लातूर, मुंबई, औरंगाबाद या महापालिका भाजपाच्या ताब्यात आहेत. नुकत्याच झालेल्या मीरा भार्इंदरच्या निवडणुकीतही भाजपाला एकहाती सत्ता मिळाली आहे. या पार्श्वभूमिवर नांदेडमध्येही मोठे परिवर्तन होईल. त्यामुळे काँग्रेसचे ५, सेनेचे ४, राष्टÑवादीचे २, सेनेचे जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख यांनी भाजपात प्रवेश घेतला. आगामी काळातही विविध पक्षांचे नगरसेवक, नेते भाजपात प्रवेश करतील, असे हंबर्डे यांनी सांगितले. शहरातील अस्वच्छता, दलितवस्तीची कामे, बीएसयुपीची कामे अर्धवट आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले असल्याचे हंबर्डे म्हणाले़ यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अॅड. चैतन्य देशमुख यांनी नांदेडमध्ये लातूर, मीरा भार्इंदरची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहरासाठी करोडो रुपयांचा निधी आला तरी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची टीका केली़ यावेळी माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, संजय कौडगे, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, विनोद पावडे, दिलीपसिंघ सोढी, विनय गुर्रम, बाळू खोमणे, दीपकसिंह रावत, बंडू पावडे, अभिषेक सौदे, नवल पोकर्णा, किशोर यादव, शीतल खांडील आदींची उपस्थिती होती.