'औरंगाबादमध्ये शंभर कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा', खासदार इम्तियाज जलील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:49 PM2021-01-29T19:49:32+5:302021-01-29T19:58:59+5:30
imtiaz jaleel : यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि शहरातील व्यापारी, बिल्डर, भूमाफिया यांनी मिळून शंभर कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे.
"उद्या औरंगाबादमधील शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा उडकीस आणणार आहे. यामध्ये महापालिका, वल्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयांमधील अधिकारी, बिल्डर आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जर पोलिसांना कुणाच्याही दबावाला बळी न पडता, याची सखोल चौकशी केली, तर नक्कीच भूमाफिया जेलमध्ये जातील, असा माझा विश्वास आहे," असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे.
Will expose over Rs 100 crore scam in Aurangabad tomorrow. It involves officers of AMC, Wakf board, registry office, builders and businessmen. If police investigates thoroughly and not buckle under pressure will make sure all these land grabbers are put behind bars.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021
दरम्यान, याआधीही खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिकेतील भ्रष्टाचारावरून जाहीर आरोप केले आहेत. त्यांनी रस्त्याची कामे, कचऱ्याचे कंत्रात, बांधकाम विभागाशी संबंधित कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी केलेल्या या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.