भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:59 PM2019-12-27T15:59:58+5:302019-12-27T16:02:59+5:30

दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे.

Will the present MLA of BJP be the city president, district president of Aurangabad? | भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

googlenewsNext
ठळक मुद्दे३० डिसेंबर रोजी निवड होण्याची शक्यतापदाधिकाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर खल करण्यात येत आहे. या दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघटनात्मक फेरबदलासाठी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक डिसेंबरच्या सुरुवातीलाच घेतली होती. तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर रोजी झाली, तरीही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळेच नियुक्त्या रखडल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे अनेकांना शहराध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. यात विद्यमान अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह पूर्वचे आमदार अतुल सावे, राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांची नावे चर्चेत आहेत.

येत्या वर्षात मराठवाडा पदवीधरची निवडणूक होणार असल्यामुळे त्याठिकाणी शिरीष बोराळकर हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष या पदात न अडकवता मराठवाडाभर फिरण्यास वेळ देण्यात यावा, असाही युक्तिवाद केला जात आहे. तर आ. सावे यांचेही नाव चर्चेत आले आहे.  त्याच वेळी औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी वैजापूरचे दिनेश परदेशी, कन्नडचे संजय खंबायते आणि फुलंब्री मतदारसंघातील विजय औताडे यांच्या नावासह गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे नाव पुढे आले आहे. या पदासाठी आ. बंबही इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणच्या अध्यक्षपदी आमदारांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

संघटना बांधणीचे प्रयत्न
भाजपमध्ये लोकप्रतिनिधींकडेच शहर आणि जिल्ह्यातील पक्षाची धुरा सोपविण्याचा विचार प्रदेशस्तरावर सुरू आहे. यातून पक्षाला सतत विविध उपक्रम देणे, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. सत्ता नसल्यामुळे हा विचार चर्चेतून समोर आला आहे. 

नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत 
भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू आहे. प्रदेश पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. जो निर्णय होईल, तो सर्वांनाच मान्य असणार आहे.
- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

Web Title: Will the present MLA of BJP be the city president, district president of Aurangabad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.