औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:24 AM2021-07-09T10:24:29+5:302021-07-09T10:25:59+5:30

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे.

Will try to bring big projects to Aurangabad, investment priority says Dr. Bhagwat Karad | औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

googlenewsNext

विकास राऊत
औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पदभार स्वीकारला. औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प तरतुदींसह यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आपल्या योजनांचे स्पष्टीकरण केले. 

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जावे, यासाठी भरीव तरतूद केंद्र शासनाकडून मिळेल, या दिशेने प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील.
 
औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कशा वाढतील, यात सर्वाधिक लक्ष घालणार आहे. डीएमआयसीसाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, उद्योग यावेत, येथील उपलब्ध सुविधांचे जगभर मार्केटिंग करण्यासाठी विशेष एजन्सी असावी, याबाबत उद्योग खात्याशी बोलून चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा दिसेल 
औरंगाबाद-पुणे या महामार्गाचे रुंदीकरण करणे, तसेच औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला गती मिळेल, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करेन. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा सर्व बाजूने यावा, असाच माझा प्रयत्न राहील.
- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
 

 

Web Title: Will try to bring big projects to Aurangabad, investment priority says Dr. Bhagwat Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.