वादळी वाऱ्याने शहरात अनेक भागांत वीज गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:10 PM2019-04-04T23:10:30+5:302019-04-04T23:11:02+5:30
दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला.
औरंगाबाद : दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला. वाºयाचा वेग इतका होता की, दूध डेअरी चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांचा खांब कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.
शहरात दिवसभरात ४१.४ अंश उन्हाच्या तडाख्यानंतर सायंकाळी ७ वाजेनंतर अचानक बदल होऊन वातावरण आल्हाददायक झाले. उकाड्याने त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला; परंतु जोरदार वाºयाने नागरिकांसह महावितरणचे अधिकारी-कर्मचारी चांगलेच हैराण झाले. वाºयामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील इंडो जर्मन टुल येथील ३३ केव्ही लाईन तुटली. त्यामुळे रात्री ८ वाजेच्या सुमारास एन-५ येथील गुलमोहर कॉलनी व परिसर, एन-६ आविष्कार कॉलनी, शुभश्री कॉलनी, संभाजी कॉलनी, मथुरानगर, सिडको एन-७, एन-८ यासह सिडको-हडकोतील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
याशिवाय रेल्वेस्टेशन येथेही ३३ केव्हीची लाईन तुटल्याने रेल्वेस्टेशन भागातील वसाहतींसह सातारा-देवळाई परिसर अंधारात बुडाला. याबरोबरच समर्थनगर, औरंगपुरा, पुंडलिकनगर, श्रीकृष्णनगरसह विविध भागांतील वीज गुल झाली.
उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे काम
रात्री दहा वाजेपर्यंत अनेक भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला, तर काही भागांत अंधार कायम होता. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत होते. वाºयामुळे सर्वत्र धूळच धूळ उडत होती. वाºयाने दूध डेअरी चौकातील ट्रॅफिक सिग्नलचा खांब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रस्त्यावर खांब पडल्याने काही वेळेसाठी जालना रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली; परंतु पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत जोरदार वारे वाहत होते.