वैजापूर, गंगापूरमध्ये वादळी पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:53 AM2018-06-20T00:53:11+5:302018-06-20T00:53:39+5:30

जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम, तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातील इंगळे वस्ती येथे भिंतीखाली दबून तीन बकऱ्या व एका कुत्र्याचा मृत्यू झाला, तर गंगापूर तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव, अगरकानडगाव, जामगाव परिसरात वादळी पावसामुळे घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. परिसरातील अनेक विद्युत खांब व वृक्ष कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. जिल्ह्यात इतर ठिकाणी कन्नड शहरासह करंजखेड, नागद, सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार व काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली.

 Windy rain loss in Vaijapur, Gangapur | वैजापूर, गंगापूरमध्ये वादळी पावसाने नुकसान

वैजापूर, गंगापूरमध्ये वादळी पावसाने नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम, तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातील इंगळे वस्ती येथे भिंतीखाली दबून तीन बकऱ्या व एका कुत्र्याचा मृत्यू झाला, तर गंगापूर तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव, अगरकानडगाव, जामगाव परिसरात वादळी पावसामुळे घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. परिसरातील अनेक विद्युत खांब व वृक्ष कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. जिल्ह्यात इतर ठिकाणी कन्नड शहरासह करंजखेड, नागद, सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार व काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली.
गंगापूर : तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव, अगरकानडगाव, जामगाव परिसरात मंगळवारी (दि.१९) सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाºयासह झालेल्या पावसाने घरांवरील पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर विद्युत खांब कोसळल्याने परिसरात काळोख निर्माण पसरल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली.
तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव या गावांना मंगळवारी वादळी वाºयाचा अधिक फटका बसला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पावसाने परिसरात हजेरी लावली.
यानंतर वादळाने नेवरगाव, ममदापूर, अगर कानडगावसह परिसरात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने भर पावसात अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. पावसामुळे घरातील धान्य, विद्युत उपकरणे, फर्निचर, कपडे आदींचे नुकसान झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममदापूर येथील कचरूरणपिसे, निर्मलदास आल्हट, अजय रणपिसे यांच्या घरांवरील पत्रे उडाली, आलम सय्यद याच्या घराची भिंत कोसळून एक वासरूदगावले.
नेवरगाव येथील बाबूराव शंकर नरवडे, मुकेश मच्ंिछद्र गायकवाड, सविता गायकवाड यांच्या घरांवरील पत्रे उडाली, तर या गावच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज तारा तुटल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला होता. वृक्ष तसेच विद्युत खांब कोसळल्याने जामगाव ते नेवरगाव रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
आळंद परिसरात हजेरी
आळंद : येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच सायंकाळीही पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
करंजखेड येथे अर्धा तास बरसला
करंजखेड : करंजखेड परिसरात मंगळवारी ८ च्या सुमारास पावसाने जवळपास अर्धातास जोरदार हजेरी लावली.
पावसाळा सुरूझाल्यापासून करंजखेड परिसरात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे करंजखेड परिसरात बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले होते. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास पावसाने अर्धातास दमदार हजेरी लावली. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.
केळगाव परिसरात तासभर पाऊस
केळगाव : सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर, आधारवाडी, कोल्हाळा, तांडा परिसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी सायंकाळी केळगाव, आधारवाडी, कोल्हाळा तांडा परिसरात विजांच्या कडकडाटांसह पावसाने १ तास हजेरी लावली. यामुळे परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, पाऊस सुरूहोताच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील बरीच गावे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
वैजापूर परिसरात दाणादाण
वैजापूर : वैजापूर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागातसुद्धा पावसाच्या सरी कोसळल्याने पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाºया शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
च्मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणी झाले. सखल भागात पाणी साचल्याने पादºयांची अडचण झाली.
च्तब्बल १५ दिवसांच्या खंडानंतर पाऊस कोसळल्याने शेतकरी आनंदित झाले असून, आणखी एखादा पाऊस पडल्यास पेरणीची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाºयामुळे शहराजवळच्या इंगळे वस्तीवरील घरांचे पत्रे उडाले, तसेच शेडची भिंत कोसळल्याने काही जनावरे दगावल्याचे वृत्त आहे.
काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम
फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे अर्धा तास जोरदार पाऊस झाला, तर पैठण तालुक्यातील चितेगाव परिसरात पावसाने नुसताच शिडकावा केला. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे हलका तर नागद येथे जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पावसाने हजेरी लावली.
च्सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात १५ मिनिटे पाऊस झाला.
वैजापूर शहरातील म्हस्की रोडवरील इंगळे वस्ती परिसरात वादळी वारा व पावसाने दाणादाण उडवली. येथील मच्छिंद्र त्रिभुवन, मुरली त्रिभुवन यांच्या खोपीचे नुकसान झाले, तर बशीर खान यांच्या घराचे व गोठ्याचे पत्रे उडल्या तसेच भिंती पडल्याने त्याखाली दबून ३ बकºया एका कुत्र्याचा मृत्यू झाला. रामनाथ इंगळे यांच्या ट्रॅक्ट्ररवर वृक्ष कोसळला, तर आसाराम इंगळे यांच्या घरासमोरील वृक्ष म्हस्की रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
पिशोर परिसरात बळीराजा सुखावला
पिशोर : सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी सकाळी पिशोरसह परिसरातील अनेक शेतकºयांनी पेरणी केली.
मंगळवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर पुन्हा रात्री सलग दुसºया दिवशी पाऊण तास दमदार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला असून, बुधवारी सकाळी बियाणे घेण्यासाठी दुकानात गर्दी होऊन पेरणीची लगबग सुरूहोण्याची अशा आहे.
वासडी येथे अर्धा तास वरुणराजाने हजेरी लावली, तर कन्नड शहरात हलका पाऊस झाला. सिल्लोडमधील उपळी रिमझिम अंभईत गेल्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
सोयगाव परिसरात अर्धा तास धो-धो
च्सोयगावसह परिसरात मंगळवारी रात्री पावसाने विजांच्या कडकडाटासह अर्धा तास हजेरी लावल्याने पावसाची प्रतीक्षा करणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला.
च्सोयगावसह जरंडी, कंकराळा, बहुलखेडा, कवली, घोसला, निमखेडी, निंबायती, गलवाडा, वेताळवाडी, रावेरी आदी भागांत पाऊस बरसल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला. वैजापूर, गंगापूरमध्ये वादळी पावसाने नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम, तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातील इंगळे वस्ती येथे भिंतीखाली दबून तीन बकºया व एका कुत्र्याचा मृत्यू झाला, तर गंगापूर तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव, अगरकानडगाव, जामगाव परिसरात वादळी पावसामुळे घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. परिसरातील अनेक विद्युत खांब व वृक्ष कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. जिल्ह्यात इतर ठिकाणी कन्नड शहरासह करंजखेड, नागद, सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार व काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली.
गंगापूर : तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव, अगरकानडगाव, जामगाव परिसरात मंगळवारी (दि.१९) सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाºयासह झालेल्या पावसाने घरांवरील पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर विद्युत खांब कोसळल्याने परिसरात काळोख निर्माण पसरल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली.
तालुक्यातील ममदापूर, नेवरगाव या गावांना मंगळवारी वादळी वाºयाचा अधिक फटका बसला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पावसाने परिसरात हजेरी लावली.
यानंतर वादळाने नेवरगाव, ममदापूर, अगर कानडगावसह परिसरात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने भर पावसात अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. पावसामुळे घरातील धान्य, विद्युत उपकरणे, फर्निचर, कपडे आदींचे नुकसान झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममदापूर येथील कचरूरणपिसे, निर्मलदास आल्हट, अजय रणपिसे यांच्या घरांवरील पत्रे उडाली, आलम सय्यद याच्या घराची भिंत कोसळून एक वासरूदगावले.
नेवरगाव येथील बाबूराव शंकर नरवडे, मुकेश मच्ंिछद्र गायकवाड, सविता गायकवाड यांच्या घरांवरील पत्रे उडाली, तर या गावच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज तारा तुटल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला होता. वृक्ष तसेच विद्युत खांब कोसळल्याने जामगाव ते नेवरगाव रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
आळंद परिसरात हजेरी
आळंद : येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच सायंकाळीही पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.
करंजखेड येथे अर्धा तास बरसला
करंजखेड : करंजखेड परिसरात मंगळवारी ८ च्या सुमारास पावसाने जवळपास अर्धातास जोरदार हजेरी लावली.
पावसाळा सुरूझाल्यापासून करंजखेड परिसरात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे करंजखेड परिसरात बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले होते. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास पावसाने अर्धातास दमदार हजेरी लावली. यामुळे

Web Title:  Windy rain loss in Vaijapur, Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस