विनर्स, कुंटे स्पोर्टस् संघात विजेतेपदाची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:28 AM2018-05-19T00:28:12+5:302018-05-19T00:29:12+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे एन-२ स्टेडियमवर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनर्स संघाने साई अकॅडमीवर आणि कुंटे स्पोर्टस्ने युनिव्हर्सल संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. स्फोटक अर्धशतकी खेळी करणारे श्रीनिवास कुलकर्णी व विश्वास वाघुले हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले. उद्या, शनिवारी या दोन संघांत सकाळी ८ वाजता एडीसीए स्टेडियमवर विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.

Winners, winners of the Kunte Sports team | विनर्स, कुंटे स्पोर्टस् संघात विजेतेपदाची लढत

विनर्स, कुंटे स्पोर्टस् संघात विजेतेपदाची लढत

googlenewsNext
ठळक मुद्देआज रंगणार फायनल : श्रीनिवास कुलकर्णी, विश्वास वाघुले सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे एन-२ स्टेडियमवर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनर्स संघाने साई अकॅडमीवर आणि कुंटे स्पोर्टस्ने युनिव्हर्सल संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. स्फोटक अर्धशतकी खेळी करणारे श्रीनिवास कुलकर्णी व विश्वास वाघुले हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले. उद्या, शनिवारी या दोन संघांत सकाळी ८ वाजता एडीसीए स्टेडियमवर विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.
आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात विनर्स संघाविरुद्ध साई अकॅडमीने प्रथम फलंदाजी करीत ३0 षटकांत ९ बाद १४४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून श्रीहर्ष पाटीलने ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या. दानिश पटेलने ४ चौकारांसह ३६ व अभिषेक भुमेने २५ धावांचे योगदान दिले. विनर्सकडून करण लव्हेरा, शशिकांत पवार व हरमितसिंग रागी यांनी प्रत्येकी २, तर हिमांशू मुकिंदने १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात श्रीनिवास कुलकर्णीच्या १0 चौकारांसह ५८ चेंडूंत फटकावलेल्या नाबाद ५८ धावांच्या बळावर विनर्स संघाने विजयी लक्ष्य २६.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. श्रीनिवासला हरमितसिंग रागीने २३, करण लव्हेराने १९ व श्रेयस गांगुर्डेने १४ धावा काढीत साथ दिली. साई अकॅडमीकडून ओमकार गुंजाळने २, तर श्रीहर्ष पाटील व कार्तिक बालय्या यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विश्वास वाघुले याने १0 चौकारांसह फटकावलेल्या ६७ धावांच्या बळावर कुंटे स्पोर्टस्ने ३0 षटकांत ८ बाद १७६ धावा फटकावल्या. ऋषिकेश नायरने १६ चेंडूंत २ षटकार व एका चौकारासह २४ व आदित्य कराडखेडेने ११ धावा केल्या. युनिव्हर्सलकडून सचिन पिसे याने ३, तर ओमकार ठाकूरने २ गडी बाद केले. रोहित नाईक व कल्पेश सवाई यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनिव्हर्सल स्पोर्टस् २१.२ षटकांत ९५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून रोहित नाईकने २0, विवेक विश्वकर्माने १९, विक्रम चौधरीने १२ व अंबादास होकेने ११ धावा केल्या. फलंदाजीत अर्धशतक ठोकणाºया विश्वास वाघुलेने गोलंदाजीतही चमक दाखवताना १८ धावांत ४ गडी बाद केले. सागर सपकाळ व अक्षय खरात यांनी प्रत्येकी २, तर आदित्य कराडखेडे याने १ गडी बाद केला.
उद्या सकाळी विजयी संघात अंतिम फेरीचा सामना खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभास जास्तीत जास्त खेळाडू व क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष पारस छाजेड, नरेंद्र पाटील, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर व कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी केले आहे.

Web Title: Winners, winners of the Kunte Sports team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.