पश्चिम विभागाचा दक्षिणवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:59 AM2018-03-22T00:59:18+5:302018-03-22T11:04:13+5:30

महाराष्ट्राची शैलीदार डावखुरी फलंदाज श्वेता जाधव हिची फलंदाजी आणि गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर पश्चिम विभागाने त्रिवेंद्रम येथे झालेल्या बीसीसीआयच्या सिनिअर महिलांच्या तीन दिवसीय इंटरझोनल क्रिकेट स्पर्धेतील लढतीत दक्षिण विभागावर १0 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाने पश्चिम विभागाने बोनस गुणासह ७ गुणांची कमाई केली.

Winning the South Zone's South Zone | पश्चिम विभागाचा दक्षिणवर दणदणीत विजय

पश्चिम विभागाचा दक्षिणवर दणदणीत विजय

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्राची शैलीदार डावखुरी फलंदाज श्वेता जाधव हिची फलंदाजी आणि गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर पश्चिम विभागाने त्रिवेंद्रम येथे झालेल्या बीसीसीआयच्या सिनिअर महिलांच्या तीन दिवसीय इंटरझोनल क्रिकेट स्पर्धेतील लढतीत दक्षिण विभागावर १0 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाने पश्चिम विभागाने बोनस गुणासह ७ गुणांची कमाई केली.
दक्षिण विभागाचा पहिला डाव २0३ धावांत आटोपल्यानंतर पश्चिम विभागाने श्वेता जाधवच्या ८१, मुग्धा जोशीच्या ७३ आणि प्राजक्ता शिरवाडकरच्या ३४ धावांच्या बळावर २१२ धावा करीत पहिल्या डावात आघाडी घेतली. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेला दक्षिण विभागाचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या ८९ धावांत कोसळला. त्यांच्याकडून निरंजन नागराजन हिने सर्वाधिक २६ धावा केल्या. पश्चिम विभागाकडून सानिया राऊत व रेणुका चौधरी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. त्यानंतर पश्चिम विभागाने विजयासाठी एकही गडी न गमावता ८२ धावा करीत हे लक्ष्य सहज पूर्ण केले. त्यांच्याकडून पालक पटेल हिने ५ चौकारांसह नाबाद ४६ व बी. श्रुती हिने नाबाद २९ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग : पहिला डाव २0३. दुसरा डाव : ८९.
पश्चिम विभाग : पहिला डाव २१२. दुसरा डाव बिनबाद ८२.

Web Title: Winning the South Zone's South Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.