‘विप्रो’चे साफल्य फर्निचर युनिट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:05 PM2019-01-11T17:05:25+5:302019-01-11T17:05:39+5:30
वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिजमार्फत सुरु असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगाराचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
वाळूज महानगर : कामगार व व्यवस्थापनात सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रिजमार्फत सुरु असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. या निर्णयामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगाराचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
वाळूज एमआयडीसीतील विप्रो इंटरप्रायजेस प्रा.लि.मार्फत ७ ते ८ वर्षांपूर्वी साफल्य इंडस्ट्रिज हे युनिट सुरु केले. या युनिटमध्ये विविध प्रकाराचे फर्निचर तयार करण्यात येते. कंपनीत २५० कामगार काम करतात. काही दिवसांपूर्वी या कंपनीतील १६१ पुरुष व ६९ महिला कामगारांनी महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे सभासदत्व स्विकारले होते. यावरुन कामगार व व्यवस्थापनात वाद सुरु झाला. त्यातच आठवडाभरापूर्वी कंपनीतून रॉ-मटेरियल बाहेर पाठविण्यावरुन पुन्हा वाद उफाळून आला.
व्यवस्थापक सुमित बंड व त्यांच्या सहकाºयांनी शिवीगाळ करुन महिला कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करीत कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी व्यवस्थापक बंड यांच्या तक्रारीवरुन कामगारांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यवस्थापन व कामगारांतील संघर्षामुळे व्यवस्थापनाने ३० डिसेंबरपासून कारखान्यातील उत्पादन प्रकिया थांबविली होती. मात्र, कंपनीतील सर्व कामगार शिफ्टप्रमाणे दररोज कंपनीत कामावर येत होते. व्यवस्थापनाने बुधवारी कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव करीत टाळे लावले. त्यामुळे संतप्त कामगारांनी दोन दिवसांपासून कंपनीतच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कंपनीत पूर्ववत सुरु करुन कामगारांना रोजगार देण्यात यावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन पा.शेळके, उपाध्यक्ष गणेश घोरपडे, शिवशंकर सगट यांनी सांगितले. कंपनी सुरु होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा कामगार प्रतिनिधीच्यावतीने राजेंद्र गवतवाड, शिवाजी कºहाळे, अशोक काळे, सोमनाथ शेळके, बाळू रणवीर आदींनी दिला आहे.
या विषयी साफल्य इंडस्ट्रिजचे भास्कर जाधव म्हणाले की, गतवर्षी मार्चपासून कामगार असहकार्य आंदोलन करुन कंपनीतील अधिकाºयांना धमकावत आहेत. त्यामुळे अधिकाºयांत भितीचे वातावरण पसरले असून, कामगारांमुळे अधिकाºयांच्या जिवीतास धोका असल्यामुळे युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामगारामुळे युनिट बंद-भास्कर जाधव (उद्योजक)
कामगार आयुक्त कार्यालयात सोमवारी बैठक
वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयात व्यवस्थापन व महाराष्टÑ कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. मात्र, व्यवस्थापनाने बैठक पुढे ढकलण्याची विनंती केल्याने सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार असल्याचे सहायक कामगार उपायुक्त शर्वरी पोटे यांनी सांगिले.