हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांचा मार्ग झाला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:19 AM2024-07-28T11:19:10+5:302024-07-28T11:22:35+5:30
फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
-रउफ शेख
फुलंब्री( छत्रपती संभाजीनगर): विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राज्यपाल पदी निवड होताच भाजप इत्छुकाच्या गोटात चलबिचल सुरु झाली रविवारी सकाळ पासून त्यांना भेटण्यासाठी इत्छुकानी रांगा लावलेल्या होत्या पक्षात एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती असून आमदारकीच्या तिकीटा येणाऱ्या काळात मारामारी पाह्यला मिळण्याची शक्यता आहे
फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते तो क्षण आता या इत्छुकाच्या हाती आलेला आहे तिकीट आपल्यालाच मिळणार आहे अशे सांगणारे भाजपा मध्ये अनेकजण आहे या इत्छुकानी तर छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री या दोन तालुक्याच्या ठिकाणी आपले स्वंतंत्र संपर्क कार्यालय या पूर्वीच थाटून ठेवलेलं आहे त्यांना हरिभाऊ बागडे याच्या विषयी कुणकुण लागलेली असावी असा कयास लावला जात आहे
बागडे नंतर कोण ?
फुलंब्री मतदार संघात भाजपचे नेते म्हटले कि केवळ हरिभाऊ बागडे याचे नाव येते त्यांचीच आता राजकारणातून एक्झिट झाल्याने त्याचा वारसदार कोण राहणार त्याची जागा कोण घेणार हा अजूनतरी अनुतरीत प्रश्न असला तरी या जागेवर कोणाला बसवायचे हा निर्णय हि हरिभाऊ बागडे हेच करतील अशी चर्चा आहे ते राज्यपाल झाले तरी या मतदार संघात त्याचा वारसदार ठरविण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे कि पक्षश्रेष्ठीं कडे आहे हे येणाऱ्या काळात समजून येईल
फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर शहरात अशा दोन ठिकाणी कॉंग्रेस कडून विलास औताडे तर भाजपा कडून विजय औताडे ,संभाजीनगर शहरात राधाकिसन पठाडे यांनी कार्यालय सुरु केले तर फुलंब्री येथे लवकर उघडणार आहे ,अनुराधा चव्हाण यांचे दोन्ही ठिकाणी संपर्क कार्लेयालय आहे आणखी काही इत्छुक कार्यालय सुरु करण्याच्या तयारीत आहेत
जालना लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदार संघातून २८ हजार मताचा तोटा झालेला असला तरी विधानसभा निवडणुकीत असे होणार नाही अशी अशा भाजपला आहे त्यामुळे तिकीट मिळाले तर पक्षाचा आमदार होईल असा अहवाल हि भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे
या मतदार संघात हरिभाऊ बागडे हे उमेदार राहिले तर कॉंग्रेस पक्षाला निवडणूक जिंकणे सोपे नाही असे चित्र होतेच पण आता ते उमेदवार नसणार हे पक्के झाल्याने कॉंग्रेस च्या गोटात हि आनंदाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पण याच्यात हि आमदारकी करिता तीन जन दावेदार आहेत तिकीटा करिता रस्सीखेच पाह्यला मिळेल असे दिसून येते
हे आहेत भाजपा मधील इच्छुक
अनुराधा चव्हाण ,राधाकिसन पठाडे ,सुहास सिरसाट ,विजय औताडे,रामभाऊ शेळके ,दामुअण्णा नवपुते ,राजेंद्र साबळे,प्रदीप पाटील
काँग्रेस मधील इच्छुक
विलास औताडे ,जगन्नाथ काळे,संदीप बोरसे
शिवसेना शिंदे गटात
अभिजित देशमुख,किशोर बलांडे
राष्ट्रवादी शरद पवार गटातून
पांडुरंग तांगडे ,राजेंद्र पाथ्रीकर