पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:48 AM2017-09-29T00:48:06+5:302017-09-29T00:48:06+5:30

तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली

 Without irrigation, it is impossible to farm | पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

पाणी असूनही शेतीला देणे अशक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडी पूर्ण भरले. पण हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकºयांना देण्यासाठी सिंचन व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत दिली. कालवे, चाºयांच्या दुरुस्तीसाठी उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचेही शिवतारे म्हणाले.
गोदावरी पाटबंधारे महामंडळात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा घेतला. पत्रपरिषदेत ते म्हणाले, जायकवाडीच्या मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तीकरण, स्लॅब उद्ध्वस्त झाल्यामुळे वहन क्षमता घटली आहे. उजव्या कालव्याची वहन क्षमता ३ हजार ६०० क्युसेक असताना केवळ १८०० क्युसेक पाणीच वाहून नेता येत आहे. डाव्या कालव्याची तर अधिकच दुरवस्था झाली. त्यातून केवळ ८०० क्युसेक पाणीच वाहू शकते. कालवे, चाºया, पोटचाºया पूर्णपणे मिटल्या आहेत. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले तरी पूर्ण क्षमतेने शेतीला पाणी देणे अशक्य आहे.
जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, गोदावरी खोºयातील पाणी अडविण्यासाठी ४८०० कोटींचा अधिकचा निधी लागणार आहे. हा निधी उभा करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.
उजनीचे पाणी मराठवाड्यात
उजनीचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. त्यासाठी सोमथळी व उधाळ बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिल्याचे शिवतारे म्हणाले.तर कृष्णा खोºयातून मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. यातील ७ टीएमसीला लवादाने मंजुरी दिल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Without irrigation, it is impossible to farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.