बतावणी करून महिलेची फसवणूक
By Admin | Published: December 29, 2014 12:52 AM2014-12-29T00:52:51+5:302014-12-29T00:56:34+5:30
उस्मानाबाद : महिलेचा खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अशी खोटी बतावणी करून एका महिलेचे ६० हजार रूपयांचे गंठण लंपास केले़ ही घटना शनिवारी सायंकाळीच्या सुमारास घडली असून,
उस्मानाबाद : महिलेचा खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अशी खोटी बतावणी करून एका महिलेचे ६० हजार रूपयांचे गंठण लंपास केले़ ही घटना शनिवारी सायंकाळीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी दोघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील आनंद नगर भागात राहणाऱ्या शकुंतला घनशाम आबुज या शनिवारी सायंकाळी लेडिज क्लबवरील सेलमध्ये साहित्य खरेदीसाठी निघाल्या होत्या़ त्या आकाशवाणी केंद्राजवळील मंगल कार्यालयाजवळील कच्च्या रस्त्यावर आल्या असता तेथे दोन युवक आले़ ‘तुम्ही पुढे जावू नका, पाटील मॅडमचा मर्डर झाला आहे़ आम्ही पोलीस आहोत’ अशी खोटी बतावणी केली़ तसेच त्यांना गळ्यातील ६० हजार रूपयांचे गंठण काढून कागदाच्या पुडीत बांधायला सांगितले़ हातात पुडी घेवून दुसरी पुडी त्यांच्या पदरात बांधायला दिली़ काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे आबुज यांच्या लक्षात आले़ या प्रकरणी शकुंतला आबुज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़