देवदर्शनाला जाणाऱ्या महिलेस भरधाव ट्रकने २० फुट फरफटत नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:12 IST2021-01-29T14:10:48+5:302021-01-29T14:12:19+5:30
Accident News Bajajnagar Aurangabad महिला ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या.

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलेस भरधाव ट्रकने २० फुट फरफटत नेले
औरंगाबाद : देवदर्शनासाठी घरून निघालेल्या महिलेस भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी बजाजनगर येथे घडली. अनुसया आत्माराम जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.
बजाजनगर येथे आपल्या मुलासोबत राहणाऱ्या अनुसया जाधव या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या द्वारका नगरी लगत असलेल्या दक्षिण मुखी हनुमान मंदिरात रोज दर्शनासाठी जात. आज सकाळी नेहमीप्रमाणे अनुसया जाधव घरातून मंदिराच्या दिशेने निघाल्या. या दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. त्या ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. ट्रकने त्यांना २० फुट फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच फौजदार प्रशांत गंभीरराव, सहाय्यक फौजदार आर. डी. वडगावकर, सोनाजी बुट्टे , को. को पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.