ट्रक्टरच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:03 AM2021-08-17T04:03:56+5:302021-08-17T04:03:56+5:30
चितेगाव : अचानक जोराचा पाऊस सुरू झाल्याने दुचाकीवरून गावी निघालेल्या पती-पत्नीने बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील एका कंपनीच्या कार्यालयासमोरील झाडाखाली आडोसा ...
चितेगाव : अचानक जोराचा पाऊस सुरू झाल्याने दुचाकीवरून गावी निघालेल्या पती-पत्नीने बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील एका कंपनीच्या कार्यालयासमोरील झाडाखाली आडोसा घेतला. तेव्हा पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पो व समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोराची धडक झाली. यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिला ट्रॅक्टरखाली चिरडली गेली. तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. भागुबाई अशोक बोबडे (३७) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर तिचा पती अशोक बोेबडे (४२, रा. दोघेही वाहेगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पती-पत्नी हे बोकुडजळगाव येथून वाहेगाव येथे घराकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान ते डीएमआयसी बिडकीन वसाहतीत पोहचताच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी पाऊस वाचण्यासाठी रस्त्याच्या कडेलगत असलेल्या झाडाचा आडोसा घेतला. त्याचवेळी पाठीमागून येणारा आयशर व समोरून येणारा ट्रॅक्टरमध्ये विचित्र धडक झाली. यात ट्रॅक्टर चालकाचा तोल सुटून ट्रॅक्टरचे मुंडके बाजूला उभे असलेल्या महिलेच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भीषण होता की, महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना तत्काळ बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास बिडकीन ठाण्याचे सपोनि. संतोष माने हे करीत आहेत.
----
महिलेचा फोटो येणे बाकी आहे.