पाण्यासाठी महिलांचा अधिकाऱ्याला घेराव
By Admin | Published: May 31, 2016 12:08 AM2016-05-31T00:08:59+5:302016-05-31T00:44:20+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगर भागात आठवडाभरापासून पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. कर भरूनही पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी
आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
अमरावती : केंद्रातील भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे जनहित विरोधी भाजपा सरकारची शहर जिल्हा कॉग्रेस कमेटीने भाजपा सरकारने दोन वर्ष सत्तेची पुर्ण केली. मात्र लोकसभा निवडणृूकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालसमोर भाजपा सरकारची पुण्यतीथी साजरी करून भाजपा सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला २६ मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र लोकसभा निवडणूकी दरम्यान १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतकाभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मागील दोन वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते यांनी केला आहे. भाजपा सरकारने जनसामान्याच्या हिताचे निर्णय न घेता उद्योगपतीचे भले केले आहे. वाठती महागाई रोखण्यास भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रदेश कॉग्रेसच्या सुचनेवरूं भाजपा सरकारची पुण्यतीथी व सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनात शहरध्यक्ष संजय अकर्ते, अर्चना सवाई, अनिल बोके, अतीक खान, सिध्दार्थ वानखङे, किशोर रायबोले, शोऐब हमीद, अनिला काजी, छाया चंदनखेडे, देवायनी कुर्वे, जयश्री वानखडे, अकत्तर मिर्झा, वंदना थोरात, संगिता धांडे, करीमा बाजी, चंद्रप्रभा इंगोले, रश्मी उपाध्ये, नाझीमा शेख, ललिता मिरासे, अनिता तायडे, आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)