गावठी पिस्तुलासह महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:32 AM2018-05-29T01:32:39+5:302018-05-29T01:33:24+5:30

जुनाबाजार परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांना वाँटेड असलेल्या महिलेस न्यायनगर येथे गावठी पिस्तूलसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. आरोपी महिलेकडून दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली.

The woman was arrested with a pistol | गावठी पिस्तुलासह महिलेला अटक

गावठी पिस्तुलासह महिलेला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुनाबाजार परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांना वाँटेड असलेल्या महिलेस न्यायनगर येथे गावठी पिस्तूलसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. आरोपी महिलेकडून दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त
केली.
ज्योती कडुबा अहिरे ऊर्फ सायरा शेख असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, मंगळसूत्र चोरीप्रकरणी मोक्कांतर्गत हर्सूल कारागृहात कैद असलेल्या शहजाद शमीम शेख (रा. आझमगड, उत्तर प्रदेश, ह.मु. औरंगाबाद) आणि आरोपी महिला लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये अनेक वर्षांपासून राहते.
२००८ साली सिटीचौक पोलीस ठाण्यात शहजादविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात ज्योती ऊर्फ सायरा शेख ही सहआरोपी होती. घटना घडल्यापासून ती पसार झाल्यामुळे ती पोलिसांना सापडत नव्हती. दरम्यान, मूळची पैठण येथील रहिवासी असलेली ज्योती हिने पतीला सोडून दिलेले आहे. ती न्यायनगर येथील एका जणाच्या घरात भाड्याने राहते आणि तिच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक योगेश धोंडे, कर्मचारी संतोष सोनवणे, सुभाष शेवाळे, काकासाहेब पंडित, सतीश हंबरडे,नाना फुंदे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, विकास गायकवाड, आनंद वाहूळ, महिला कर्मचारी रेखा चांदे आणि शेख सुलताना यांनी २८ मे रोजी सकाळी न्यायनगर येथे महिलेच्या घरावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष तिच्या घराची झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली.

Web Title: The woman was arrested with a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक