जोगेश्वरीत महिलेचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:04 AM2021-01-25T04:04:51+5:302021-01-25T04:04:51+5:30

चंद्रकला राजकुमार इंगोले यांची मुलगी रसिका (वय १२) ही शुक्रवारी (दि. २२) दुपारी चार वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. ...

The woman's head was smashed in Jogeshwari | जोगेश्वरीत महिलेचे डोके फोडले

जोगेश्वरीत महिलेचे डोके फोडले

googlenewsNext

चंद्रकला राजकुमार इंगोले यांची मुलगी रसिका (वय १२) ही शुक्रवारी (दि. २२) दुपारी चार वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. यावेळी अनोळखी महिलेने रसिका हिला चॉकलेट दिले; मात्र तिने चॉकलेट न घेतल्याने त्या महिलेने रसिकाला मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या रसिकाने आरडा-ओरडा केला असता तिची आई चंद्रकला हिने त्या महिलेला जाब विचारला. संतप्त झालेल्या त्या अनोळखी महिलेने चंद्रकला हिच्या डोक्यात स्टीलची कॅटली मारून निघून गेली. काही वेळाने त्या अनोळखी महिलेने तिच्या आई व बहिणीला सोबत आणून पुन्हा चंद्रकला यांना शिवीगाळ करून तिच्या डोक्यात कॅटली मारून डोके फोडले. या प्रकरणी चंद्रकला इंगळे यांच्या तक्रारीवरून खिल्लारे बाई, सीमा व वनिता (पूर्ण नावे माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------------

२२ हजारांचा गुटखा पकडला

वाळूज महानगर : प्रतिबंधित पान मसाला व गुटख्याची विक्री करणाऱ्या एकास वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी छापा टाकून पकडत २२ हजारांचा गुटका जप्त केला आहे.

वाळूजच्या अजवानगरात प्रतिबंधित गुटख्याची एकजण चोरी-छुपे विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने वाळूज पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अजवानगरात मोहिन दय्यान पठाण (वय २१) याच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात बंदी असलेल्या हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पुडे मिळून आले. यानंतर पोलीस पथकाने मोहिन पठाण याला ताब्यात घेऊन गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाच्या अन्न व सुरक्षा अधिकारी मेघा फाळके यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहिन पठाण याच्याविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman's head was smashed in Jogeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.