महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

By संतोष हिरेमठ | Published: March 19, 2023 01:49 PM2023-03-19T13:49:26+5:302023-03-19T14:05:06+5:30

रुग्णालयात अवयवदानासाठी प्रक्रिया सुरू आहे.

Woman's organ donation, lung donation for the first time in Chhatrapati Sambhajinagar | महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :  ब्रेन स्ट्रोकनंतर ब्रेन डेड झालेल्या ४१ वर्षीय महिलेच्या अवयवदानाची तयारी शहरातील एमजीएम रुग्णालयात सुरू आहे. किडनी, लिव्हरसोबत शहरात प्रथमच फुप्फुस दान करण्याची तयारी करण्यात आली. शहरातून विमानाने मुंबईला फुप्फुस पाठविण्यात येणार होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात फुप्फुस दान टळले.

वर्षा सारंग चौधरी (रा. भोकरदन, जालना) असे या महिलेचे नाव आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना १५ मार्च रोजी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी पुणे, सातारा येथे  उपचार करण्यात आले होते. एमजीम रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटूंबियांनी अव्यवदनाचा निर्णय घेतला. त्यानुसार रुग्णालयात अवयवदानासाठी प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही किडन्या आणि लिव्हरचे शहरातील खाजगी रुग्णालयात प्रत्यारोपण होणार आहे. तर फुप्फुस मुंबईला पाठविण्यात येणार होते.

Web Title: Woman's organ donation, lung donation for the first time in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.