सोने उजळून देतो म्हणून महिलांना फसविले

By Admin | Published: July 15, 2017 11:50 PM2017-07-15T23:50:04+5:302017-07-15T23:53:08+5:30

हिंगोली :सोन्याचे दागिने उजळून दिले जातील, तसेच सदर दागिन्याची डिझाईन कंपनीस पसंत आल्यास तुम्हाला बक्षीस मिळेल. शिवाय दिलेल्या सोन्याच्या वस्तूही परत केल्या जातील,

Women cheat women as they shine gold | सोने उजळून देतो म्हणून महिलांना फसविले

सोने उजळून देतो म्हणून महिलांना फसविले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सोन्याचे दागिने उजळून दिले जातील, तसेच सदर दागिन्याची डिझाईन कंपनीस पसंत आल्यास तुम्हाला बक्षीस मिळेल. शिवाय दिलेल्या सोन्याच्या वस्तूही परत केल्या जातील, असे म्हणत एका महिलेने चार महिलांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी १५ जुलै रोजी हिंगोली शहर पोलिसांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीत खुशालनगर येथे मागील काही दिवसांपासून एक अनोळखी महिला जुने भांडे घेऊन नवीन भांडे (स्टील, तांबा, पितळ) दिले जातील. दागिनेही उजळून मिळतील असे म्हणत फिरत होती. या अनोळखी माहिलेने १४ जुलै रोजी खुशालनगर येथील शेख हीना शेख एजाज, रूख्मिना विठ्ठल गिद यांच्यासह एका लहान मुलीचे व दोन महिलांचे सोने व चांदिचे दागिने नेले. दागिन्यांवर बक्षिस दिले जाईल व ते परत केले जातील, असे म्हणून जवळपास एक लाखांचे दागिने घेऊन गेली. परंतु ती परतलीच नाही. तिने दिलेला पत्ताही चूकीचा निघाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून अनोळखी महिलेविरूद्ध हिंगोली शहर पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Women cheat women as they shine gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.