महिला काँग्रेसची लातुरात निदर्शने

By Admin | Published: January 17, 2017 10:46 PM2017-01-17T22:46:52+5:302017-01-17T22:49:03+5:30

लातूर : खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडर व डायरीवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधानांचा फोटो छापल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली

Women Congress demonstrators | महिला काँग्रेसची लातुरात निदर्शने

महिला काँग्रेसची लातुरात निदर्शने

googlenewsNext

लातूर : खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडर व डायरीवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधानांचा फोटो छापल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिवाय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॅलेंडरचे दहनही करण्यात आले.
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडर व डायरीवर असलेला महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छापण्यात आले आहे. यामुळे गांधी विचाराला मानणाऱ्या व्यक्तींच्या भावनेस ठेस पोहोचली असल्याचा आरोप करीत महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. महात्मा गांधींचे छायाचित्र काढून पंतप्रधानांचे छायाचित्र छापले, याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांची माफी मागावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रा.डॉ. स्मिता खानापुरे, जिल्हाध्यक्षा सुनीता आरळीकर, शहराध्यक्षा सपना किसवे, सीमाताई क्षीरसागर, केशरबाई महापुरे, कल्पनाताई मोरे, योजना कामेगावकर, सरिता जगताप, शशिकला यादव, दैवशाला राजमाने, शुभांगी कुलकर्णी, रत्नमाला घोडके, सविता पवार, सीताबाई राठोड, शशिकला आडे, दर्शना देशमुख, पूजा कुटे, आशा हतांगळे, मिनाक्षी शेटे, पंचशिला भोसले, दैवशाला सोमवंशी, क्रांती नाईकवाडे आदींची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Women Congress demonstrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.