पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीमध्ये ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:04 AM2021-03-23T04:04:22+5:302021-03-23T04:04:22+5:30

महामार्गाचे काम सुरू असल्याने खंडाळा येथील काही भागांतील नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून या भागातील नागरिकांना ...

Women in the gram panchayat for water | पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीमध्ये ठाण

पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीमध्ये ठाण

googlenewsNext

महामार्गाचे काम सुरू असल्याने खंडाळा येथील काही भागांतील नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे-तिकडे पायपीट करावी लागत आहे. नवीन पाइपलाइनचे काम नवनिर्वाचित सदस्यांनी बोगस होत असल्याचे कारण सांगून बंद पाडले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निवेदने देऊनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने, शेवटी साेमवारी महिलांचा राग अनावर झाला. महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय गाठून तीव्र निषेध केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी हजर नसल्याने जोपर्यंत ते येत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, म्हणत महिलांनी तेथेच ठाण मांडले होते. ग्रामपंचायत सदस्य हजर नसल्याने, उद्या या विषयावर मासिक सभा घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी एन.जी. राहिंज यांनी यावेळी दिली.

फोटो : खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या महिला.

220321\img20210322111912_1.jpg

खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयात पाण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या महिला.

Web Title: Women in the gram panchayat for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.