फुलंब्री तालुक्यातील ३७ गावांचा कारभार महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:30+5:302021-02-05T04:07:30+5:30
सर्वसाधारणसाठी कान्हेगाव, पीरबावडा, पिंपळगाव गांगदेव, तळेगाव, वाणेगाव, बोधेगाव खु, गेवराई पयागा, शेवता, पेंडगाव आळंद, सोनारी खु, खामगाव, बोरगाव अर्ज, ...
सर्वसाधारणसाठी कान्हेगाव, पीरबावडा, पिंपळगाव गांगदेव, तळेगाव, वाणेगाव, बोधेगाव खु, गेवराई पयागा, शेवता, पेंडगाव आळंद, सोनारी खु, खामगाव, बोरगाव अर्ज, सताळा बु., शेलगाव खु., गणोरी, बिल्डा, शिरोडी बु., लहानेवाडी, डोंगरगाव कवाड, दरेगाव दरी, बाभुळगाव खु., तर ओबीसी महिलांसाठी मुर्शिदाबाद वाडी, जानेफळ शेलगाव, बोधेगाव बु, वाहेगाव, डोंगरगाव शिव, सुलतान वाडी, लालवन, साताळ पिंप्री, लोहगड नांद्रा, रिधोरा या गावांचा समावेश आहे. यासह हिवरा, आळंद, उमरावती, नारला-भावडी, चिंचोली बु, शिरोडी खु., पिंपळगाव वळण, पानवाडी, वीरमगाव या गावात ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आहे. याशिवाय निमखेडा येथे अनुसूचित जाती, अडगावात अनुसूचित जाती, धानोरा अनुसूचित जाती, तर सांजूळ अनुसूचित जमाती महिला, लिहा अनुसूचित जाती महिला, जातवा अनुसूचित जाती महिला, गेवराई गुंगीमध्ये अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण निघाले. तालुक्यात ३७ गावांत येत्या पाच वर्ष महिलाचे राज्य असणार आहे.
कॅप्शन : फुलंब्री तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत आरक्षणाची चिठ्ठी काढताना सिफा शेख.