महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले

By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2023 02:26 PM2023-06-20T14:26:48+5:302023-06-20T14:28:27+5:30

एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्र योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Women most interested in the post; 13 crore invested in two months | महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले

महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने महिलांसाठी या आर्थिक वर्षापासून महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात १,७९७ महिलांनी १३ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पोस्टाने एक पर्वणीच आणली आहे.

एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्र योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही योजना पोस्टाने महिला व मुलींसाठी आणली आहे. बचतपत्राचा कालावधी दोन वर्षांचा असून, ७.५ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज दिल्याने परतावाही चांगला आहे. बँकेत दर तीन महिन्यांनी बचत खात्याला व्याज जोडले जाते.

एका महिलेला १,००० रुपयांपासून ते दाेन लाखांपर्यंतची बचत करता येते. ३२ हजार ४४ रुपयांचा परतावा त्यांना मिळणार आहे. महिलेच्या किंवा मुलीच्या वतीने तिचे पालक बचतपत्रही घेऊ शकतात. या महिलांसाठी टपाल खात्याने ही योजना आणून आर्थिक पाठबळच दिले आहे. एक वर्षानंतर काही अडचण अथवा आजारपण आल्यास ४० टक्के रक्कम एकदाच काढण्याची तरतूददेखील या योजनेत आहे.

काय आहे महिला बचतपत्र योजना?
केंद्र सरकारने महिलांसाठी या आर्थिक वर्षापासून महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. दोन वर्षांसाठीच ही योजना असून, इतर बँकांपेक्षा पोस्टात सर्वाधिक व्याजदर दिलेला आहे. त्याचा महिला योग्यपद्धतीने फायदा घेत आहेत.

जास्तीत जास्त दोन लाखांची गुंतवणूक

या योजनेत १,००० रुपयांपासून ते दाेन लाखांची गुंतवणूक एका महिलेला करता येते.अनेक महिला खातेही उघडता येतात; परंतु, त्यात तीन महिन्याचे अंतर असावे. एका गुंतवणुकीत दाेन लाखांची लिमिट आहे. दोन लाखांवर दोन वर्षांत ३२ हजार ४४ रुपयांचा परतावा ७.५ टक्के दराने व्याज दिले जात असल्याने दोन लाखांवर दोन वर्षांत ३२ हजार ४४ हजार रुपये तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळणार आहे.

दोन महिन्यांत १३ कोटींवर गुंतवणूक...
जिल्ह्यात १,७९७ महिलांनी १३ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोस्टमनकडे अथवा कार्यालयात खाते उघडा महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत असून बचत गटातील उद्योजक महिलांना या योजनेत जोडण्याचा अधिक प्रयत्न आहे. १,०१० खातेदार महिला जोडल्या गेल्या असून गती वाढलेली आहे. नजीकच्या पोस्टात जाऊन महिला सन्मान बचतपत्र घेता येते.
- शहादेव सातपुते, पोस्टाचे व्यवसाय अधिकारी

Web Title: Women most interested in the post; 13 crore invested in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.