डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 07:58 PM2018-10-19T19:58:59+5:302018-10-19T19:59:19+5:30
: डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जटवाडा रस्त्यावरील राजनगर येथे उघडकीस आली.
औरंगाबाद : डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जटवाडा रस्त्यावरील राजनगर येथे आज दुपारी उघडकीस आली. नग्नावस्थेतील मृतदेहाशेजारी झोपलेल्या चारवर्षीय बालिकेला घरात कोंडून आरोपी पसार झाला. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास चिमुकली रडतच आतून दार वाजवत असल्याने शेजाऱ्यांनी दार उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कविता ऊर्फ सोनी अशोक जाधव (३३), असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती अशोक जाधव बांधकाम मिस्तरी असून, त्याला दारूचे व्यसन आहे. जाधव दाम्पत्याला दोन मुली आणि मुलगा अशी अपत्ये असून, मोठा मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी आंबेडकरनगर येथील कविताच्या आईकडे राहतात. कविता ऊर्फ सोनी ही पती अशोक आणि लहान मुलगी आकांक्षा(४) हिच्यासोबत जटवाडा रस्त्याजवळील राजनगर येथे राहत होती.
अशोक गुरुवारी सकाळी कामावर गेला होता. त्यानंतर तो दिसून आला नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळपासून कविताच्या घराला बाहेरून कडी लावलेली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कविताच्या घरातून आकांक्षाचा रडण्याचा आणि दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकू न आरेफा यांनी दार उघडले. त्यावेळी आकांक्षा रडतच बाहेर आली. आरेफा आणि शेजारी राहणाऱ्या घरमालकीण यांना आकांक्षाने रडतच आई घरात असल्याचे सांगितले. त्यांनी कविताच्या घरात डोक ावून पाहिले असता ती नग्नावस्थेत रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. या घटनेची माहिती त्यांनी हर्सूल पोलिसांना कळविली.
उपनिरीक्षक सरला गाडेकर, सहायक उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार, विठ्ठल जवखेडे, गिरी, पोहेकॉ खरात आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी गोधडीवर रक्ताच्या थोराळ्यात नग्नावस्थेत कविताच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्घृण खून केल्याचे पोलिसांना आढळून आले. खून करण्यासाठी वापरलेला दगडही मृतदेहाशेजारी होता. मारेकरी आणि कविता यांच्यात झटापट झाली असावी, असे घटनास्थळी पडलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांवरून पोलिसांच्या निदर्शनास आले. शिवाय मृतदेहाशेजारी पाच ते सहा अंडी होती. तिचा खून पतीने केला असावा, असा संशय पोलिसांना असून, त्याचा शोध सुरू आहे.