आता छत्रपती संभाजीनगरातील ५ ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकपदी महिला

By सुमित डोळे | Published: February 8, 2024 12:03 PM2024-02-08T12:03:47+5:302024-02-08T12:03:58+5:30

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या राज्यस्तरीय बदल्यानंतर शहरातील वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांची यादी बुधवारी जारी झाली.

Women Police Inspectors of 5 stations in Chhatrapati Sambhajinagar | आता छत्रपती संभाजीनगरातील ५ ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकपदी महिला

आता छत्रपती संभाजीनगरातील ५ ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकपदी महिला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या क्रांतीचौक पाेलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षकपदाचा पदभार रेखा लोंढे यांना देण्यात आला आहे. या बदल्यांनंतर आता आयुक्तालयात ५ पोलिस ठाण्यांचा पदभार महिला अधिकारी सांभाळणार आहेत. यापूर्वी सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी गीता बागवडे तर वेदांतनगरच्या निरीक्षकपदी प्रवीणा यादव यांना पदभार देण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या राज्यस्तरीय बदल्यानंतर शहरातील वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांची यादी बुधवारी जारी झाली. एकाच वेळी सहा महत्त्वाच्या निरीक्षकांची नागपूर व अन्य ठिकाणी बदली झाल्याने अनेक ठाण्यांचे निरीक्षक पद रिक्त झाले होते. दरम्यान, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

कोण - कोठून- काेठे (पोलिस ठाणे)

शुभांगी देशमुख- नागपूर शहर-क्रांतीचौक
रेखा लोंढे-अमरावती शहर-बेगमपुरा
सुनीता मिसाळ-बेगमपुरा-हर्सूल
जनार्दन साळुंके-विशेष शाखा-दौलताबाद
राजेंद्र होळकर-क्रांतीचौक-छावणी
कृष्णचंद्रा शिंदे-नागपूर शहर-विशेष शाखा
गणेश ताठे-एम वाळूज - छावणी वाहतूक शाखा 

Web Title: Women Police Inspectors of 5 stations in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.