गौरींच्या स्वागतासाठी महिला सज्ज़़
By Admin | Published: September 7, 2014 11:55 PM2014-09-07T23:55:03+5:302014-09-08T00:04:27+5:30
नांदेड: नांदेड : शहरात घरोघरी गौरींच्या स्वागताची पारंपरिक पद्धतीने तयारी झाली आहे़ तसेच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला़
नांदेड: नांदेड : शहरात घरोघरी गौरींच्या स्वागताची पारंपरिक पद्धतीने तयारी झाली आहे़ तसेच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला़ यंदाही मुखवटे, साज, अडणी आणि फराळाच्या साहित्याचे दर वाढले आहेत़
गणरायाच्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरोघरी मांगल्याचे वातावरण घेवून येत आहे़ वजिराबाद, श्रीनगर आणि जुना मोंढा आदी बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती़ काही वस्तूंच्या किमतीत दरवाढ झाली आहे़ महागाईला सारून महिलांनी बाजारपेठेतून मिठाई आणि सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या़ वजिराबाद, शिवाजीनगर आदी ठिकाणच्या मिठाई दुकानांवर ग्राहकांची गर्दी पडली होती़ काही महिलांनी परंपरेनुसार मुखवटे रंगवून घेतले़ तयार मंडपाच्या खरेदीकडे महिलांचा कल दिसून आला़
फराळ साहित्यांची खरेदी
लक्ष्मीला खास नैवेद्य वाहिल्या जाणाऱ्या फराळाच्या साहित्यात यंदाही १०-१५ टक्के वाढ झाली आहे़ लाडू (१०० रू) करंजी (१७० ते ३०० रू) रवा लाडू (१५० ते २०० रू) जिलेबी( ८० ते १२०) अनारस (१९० ते २२०) म्हैसूरपाक (१७० रू) शंकरपाळी (१८० रू) शेवचिवडा (१५० रू), बर्फी (३४०रू) गुलाब जामून (१९० रू) आदी पदार्थ खरेदी केले गेले़
गौरीचे आगमन
मंगळवार, २ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र सुरू होत आहे़ सायंकाळी ६ वाजता गौरीचे आवाहऩ आगमन करता येते़ बुधवार, ३ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे गौरीपूजन आणि भोजऩ गुरूवार ४ सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्रावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत गौरी विसर्जन करावे़ (प्रतिनिधी)