भोकरदनमध्ये वीस ग्रामपचायतींमध्ये महिलाराज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:31 AM2017-10-10T00:31:31+5:302017-10-10T00:31:31+5:30
३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.
भोकरदन : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी येथील नगरपरिषद कार्यालयात मतमोजणी झाली. ३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.
तीन ग्रामपचंयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे २९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले.
निवडणुकीत प्रतिष्ठेच्या असलेल्या राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळविला तर सावंगी अवघडराव ही भाजपाच्या ताब्यातील ग्रामपचयंत राष्ट्रवादी व शिवसेनेने ताब्यात घेतली आहे़ गोकुळ ग्रामपचंयतीमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान सरपंच समाधान शेरकर यांनी स्वप्नील शेळके यांचा केवळ ५ मताने पराभव केला. त्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. यात शेरकर विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
विजयी सरंपच :
जवखेडा खुर्द- यंशवत बनसोडे (बिनविरोध)
गव्हाण संगमेश्वर - विशाल ढवळे (बिनविरोध) ,
मनापूर- कासाबाई लक्ष्मण दळवी (बिनविरोध)
जवखेडा बु- इंदबाई कुंडलिक पवार,
कठोरा जैनपूर-सुरजाबाई बिसन जाधव,
राजूर- भाऊसाहेब भुंजग,
चोºहाळा-मासनपूर- कमल संतोष लोखंडे,
वडशेद- श्रीरंग भवर,
निंबोळा- दिलीप लंबे,
ताडकळस- सुरमाबाई शंकर जाधव,
पिंपरी- कांताबाई विष्णू आंभोरे,
करजगाव- मनोहर कानडे,
वरूडु बु- कौशल्याबाई सिरसाठ,
गोकुळ- समाधान शेरकर,
वालसा- डावरगाव -समाधान वाघ,
पद्यमावती- रमेश तराळ,
एकेफळ- वर्षा शिवाजी गव्हाड,
तपोवन- छायाबाई रामलाल चव्हाण,
खामखेडा- मंगलाबाई गजानन नागवे,
पळसखेडा- दाभाडी परमेश्वर खरात,
भिवपूर- सरला खंडु जाधव,
कोठाकोळी- आंबादास बावस्कर,
देहेड- भारती तान्हाजी बावस्कर,
नांजा- भागुबाई चंद्रकांत मोरे
सांवगी अवघडराव- रबियाबी करीम,
रेलगाव- सुमनबाई यादवराव मिसाळ,
शेलूद- तडवी आशा इसाक,
पिंपळगाव बारव- कैलास सखाराम जाधव,
लतिफपूर- शेख अरशियाबी रबीब,
मोहळाई- सांडू मारोती पालकर,
वालसा खालसा- संजय लक्ष्मण जाधव (शिवसेना) दिपाली बप्पासाहेब उदरभरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
राजूरच्या सरपंचपदी भाऊसाहेब भुजंग विजयी
राजूर : राजूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. भाजपने अकरा सदस्यपदांच्या जागा मिळवल्या तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्टÑवादीला एकही जागा मिळवता आली नाही. राजूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तिरंगी लढत झाली. यामधे भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. राष्टÑवादी काँग्रेसचे सांडू पुंगळे दुस-या तर शिवसेनेचे विनायकराव पुंगळे तिस-या क्रमांकावर राहीले. सदस्य पदी राहुल दरक, रामेश्वर सोनवणे, ताईबाई दादाराव मगरे, शेख मुसा शेख रहेमान, सुशिलाबाई भुजंग, चंद्रकलाबाई कृष्णा जाधव, संगिता आप्पासाहेब पुंगळे, अनिता निवृत्ती पुंगळे, रामबाई शिवाजी जगताप, विष्णु राज्यकर, लहानूबाई बबन मगरे, विनोद डवले, जीजाबाई त्रिंंबक मगरे यांनी विजय मिळवला.