दारुबंदीसाठी सरसावल्या सवना येथील महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:03 AM2017-09-21T00:03:39+5:302017-09-21T00:03:39+5:30
सेनगाव तालुक्यातील सवना येथील तांड्यावर मागील काही दिवसांपासून विक्री होत असलेल्या दारुकडे पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने व्यसनानिधनतेत वाढच होत आहे. त्यामुळे बुधवारी महिलांनी आक्रमक होऊन दारु बंद करण्याचे निवेदन गोरेगाव पोलिसांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना येथील तांड्यावर मागील काही दिवसांपासून विक्री होत असलेल्या दारुकडे पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने व्यसनानिधनतेत वाढच होत आहे. त्यामुळे बुधवारी महिलांनी आक्रमक होऊन दारु बंद करण्याचे निवेदन गोरेगाव पोलिसांना दिले.
सवना तांड्यावर देशीसह गावठी दारु सर्रास विक्री होत आहे. यावर पोलीस प्रशासनाचा जराही अंकूश नसल्याने दारु विक्रेते भयमुक्त वातावरणात दारु विक्री करीत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. तर रात्रीच्या वेळेस गावाची शांतताभंग होत आहे. त्यामुळे सर्रास विक्री होत असलेली दारु विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर लताबाई भालेराव, सुमित्रा भालेराव, दीपाली पाहारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.