पिसादेवी परिसरात गहू काढल्यानंतर शेतात उरलेल्या ओंब्या जमा करण्यासाठी महिलांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 03:18 PM2022-03-31T15:18:52+5:302022-03-31T15:20:01+5:30

सदरील महिलांची संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गव्हाचे भाव अचानकपणे वाढल्याने एवढा महागव खरेदी करू शकत नाही.

Women struggle to collect leftovers in the field after harvesting wheat in Pisadevi area | पिसादेवी परिसरात गहू काढल्यानंतर शेतात उरलेल्या ओंब्या जमा करण्यासाठी महिलांची धडपड

पिसादेवी परिसरात गहू काढल्यानंतर शेतात उरलेल्या ओंब्या जमा करण्यासाठी महिलांची धडपड

googlenewsNext

औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील पिसादेवी परिसरात शेतकऱ्यांनी गव्हाची सोंगणी केली.  शेतात लावलेला गहू काढला, आणि बाजारपेठेत गावाला भाव चांगला मिळायला लागला. मात्र काही गरीब कुटुंबाच्या गव्हाचे भाव आवाक्याच्या बाहेर गेल्याने पोटाची खळगी भरायची कशी असा मोठा प्रश्न काही कुटुंबांची समोर उभा राहिला आहे. मात्र आता यावर ती काही गरीब कुटुंबाने उपाय शोधून काढला असून गव्हाची सोंगणी झालेल्या शेतात, हे कुटुंब गव्हाच्या ओंब्या जमा करून वाया जाणारा गहू जमा करून सदरील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न काही गरीब महिला करताना दिसत आहे.

सदरील महिलांची संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गव्हाचे भाव अचानकपणे वाढल्याने एवढा महागव खरेदी करू शकत नाही. येणाऱ्या सणासुद आला व्हाची पोळी भेटावी या दृष्टिकोनातून आम्ही शेतातून वाया जाणार्‍या ओंब्या जमा करून त्यातून गहू जमा करत असल्याची भावना एका महिलेने माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आहे. या माध्यमातून एका शेतातून किमान 80 ते 90 किलो गहू जमा होतो. एका शेतातून गव्हाच्या ओंब्या जमा करायला सात ते आठ दिवस लागतात. मात्र यातून थोडाफार का होत नाही गहू जमा होतो अशी भावना सदरील महिलांनी बोलून दाखवली आहे.

एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे हाताला असलेली कामे गेल्याने आता जगण्यासाठी नवीन धडपड काही कुटुंबांना करावी लागत आहे, याची प्रचिती आज औरंगाबाद शहरातील पिसादेवी या परिसरात पाहण्यास मिळाली एकीकडे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना, दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी काही कुटुंबांना अशी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आज औरंगाबाद जिल्ह्यात समोर आले आहे.

Web Title: Women struggle to collect leftovers in the field after harvesting wheat in Pisadevi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.