पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:51 AM2019-06-12T11:51:35+5:302019-06-12T11:55:43+5:30

ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी फर्निचर रस्त्यावर फेकले

women suffering from water scarcity throws furniture out of gram panchayat office in Nagad | पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर

पाणी टंचाईमुळे त्रस्त रणरागिणींनी ग्रामपंचायतीच्या टेबल, खुर्च्या फेकल्या रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे पदाधिकाऱ्यांना धरले धारेवरउन्हाळा संपला तरीही पाण्याची बोंब

नागद (औरंगाबाद ) : पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी थेट नागद ग्रुप ग्रामपंचायत गाठली. मात्र, येथे ग्रामसेवकासह पदाधिकारी उपस्थित नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांसह नागरिकांनी येथील फर्निचर रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त केला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

कन्नड तालुक्यातील नागद ग्रुप ग्रामपंचायत पिण्याचे पाणी पुरविण्यास असमर्थ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी नागद येथील बसस्थानक भाग, मटवाडी, प्रेमनगर, सदाशिववाडी, आंबेडकरनगर, बजरंग चौक येथील नागरिकांसह महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, येथे सरपंच, उपसरपंचासह ग्रामविस्तार अधिकारी ग्रा.पं. सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. यामुळे ग्रामस्थांचा पारा अधिकच चढला. संतापलेल्या शेकडो महिलांसह नागरिकांनी सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांना फोन केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रवेश करून येथील फर्निचरसह खुर्च्या बाहेर फेकून आपला संताप व्यक्त केला. 

माहिती मिळताच सरपंच सीताबाई सोनवणे यांनी कार्यालय गाठले. यावेळी त्यांना घेराव घालून ग्रामस्थांनी पाणीटंचाईबाबत जाब विचारला. गडदगड मध्यम प्रकल्पातील पिण्याचे पाणी राखीव असताना अवैध उपसा कसा होतो, असा सवाल येथे उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित केला. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागद येथे पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे पत्र का दिले, अशा प्रश्नांचा मारा सुरू केला. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

पत्र लिहून घेतले
सरपंच सोनवणे यांनी सांगितले की, माझ्यावर दबाव टाकून तसेच पत्र लिहून घेतले. यावेळी लताबाई ठाकरे, नीता ठाकरे, ललिता परदेशी, सुनंदा पाटील, अनिता सोनवणे, फरिदा, शांता राजपूत, सुमन जाधव, नंदा राजपूत, विद्या मोरे, धना जाधव, पार्वता सोनवणे, नाना अहिरे, ईश्वर जाधव, रणवीरसिंग राजपूत, भोला महाजन, अमोल कुंभे, अशोक सोनवणे, अनिल पाटील, समाधान साळवे, राजेंद्र पाटील, संजय गडवे, विष्णू ससाने यांच्यासह शेकडो महिलांसह पुरुषांची उपस्थिती होती.

Web Title: women suffering from water scarcity throws furniture out of gram panchayat office in Nagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.