छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

By विकास राऊत | Updated: March 8, 2025 13:30 IST2025-03-08T13:29:56+5:302025-03-08T13:30:11+5:30

Women's Day Special: विभागीय आयुक्त या पदापासून महिला अधिकारी दूरच

Women's Day Special: In Chhatrapati Sambhajinagar, only two women got the opportunity to become District Collector in 69 years. | छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

- विकास वत्सला पुंडलिक राऊत
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदावर ६९ वर्षांत फक्त दोन महिला अधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे. तर विभागीय आयुक्तपदावर आजवर एकाही महिला अधिकाऱ्याला संधी मिळालेली नाही. ८ मार्च जागतिक महिलादिनी स्त्री सक्षमीकरण, हक्क, न्यायाच्या समानतेच्या मुद्यावर परिसंवाद, चर्चासत्रे, भाषणे होतील. मात्र महिलांना समान हक्क मिळण्यासाठी नियमानुकूल संधी मिळण्यास केव्हा सुरुवात हा प्रश्न अनुत्तरीत राहील. अधिकारांच्या पदावर महिलांची नियुक्ती करण्याची वेळ येते तेव्हा शासकीय यंत्रणेत विविध कारणांमुळे संधी डावलण्यात येते. ही वस्तुस्थिती आगामी काळात बदलेल, अशी अपेक्षा आहे.

आजवर ४३ जिल्हाधिकारी
१९५६ साली बी. एल. कुलकर्णी यांनी पहिले जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला होता. विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत. त्यांच्यासह आजवर ४३ जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाले. त्यात २००१ ते २००४ या काळात व्ही. राधा या जिल्हाधिकारी होत्या. त्यानंतर २०१५ साली डॉ. निधी पाण्डेय यांना संधी मिळाली.

आजवर ३२ विभागीय आयुक्त
आजवर ३२ विभागीय आयुक्त झाले. पहिले विभागीय आयुक्त म्हणून एम. आर. यार्दी यांनी १ नोव्हेबर १९५६ साली पदभार घेतला होता. आजवर ३२ जणांना विभागीय आयुक्त होण्याची संधी मिळाली. त्यात एकाही महिला अधिकाऱ्याचा समावेश नाही. मराठवाड्यात महसूल प्रशासनात १ हजार ५०० च्या आसपास महिला कर्मचारी-अधिकारी आहेत.

जिल्हा प्रशासनात १७२ महिला कर्मचारी
जिल्हा प्रशासनात सर्व मिळून १७२ महिला कर्मचारी आहेत. यात अधिकारी पदावर ५ व इतर संवर्गात ३६ महिला कर्मचारी या मुख्यालयात कार्यरत आहेत. तर जिल्ह्यात ५ महिला अधिकारी असून १३८ इतर संवर्गातील महिला कर्मचारी आहेत. यात वर्ग-४, वर्ग-३, वर्ग-२ पदावर काम करणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Women's Day Special: In Chhatrapati Sambhajinagar, only two women got the opportunity to become District Collector in 69 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.