महिलांसाठी विशेष योजना, पोस्टात दोन लाख जमा करा; दोन वर्षांत दोन लाख ३२ हजार मिळवा!

By साहेबराव हिवराळे | Published: September 15, 2023 07:50 PM2023-09-15T19:50:20+5:302023-09-15T19:54:07+5:30

दोन लाखांपर्यंत महिला कितीही बचतपत्र काढू शकते.

Womens special scheme, Deposit Two Lakhs in Post; Get two lakh 32 thousand in two years! | महिलांसाठी विशेष योजना, पोस्टात दोन लाख जमा करा; दोन वर्षांत दोन लाख ३२ हजार मिळवा!

महिलांसाठी विशेष योजना, पोस्टात दोन लाख जमा करा; दोन वर्षांत दोन लाख ३२ हजार मिळवा!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पोस्टाने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत योजनेत गेल्या पाच महिन्यांत ४२ कोटी ९६ लाख ६८३०० रुपये जमा झाले आहेत. ७.५ टक्के दराने पोस्ट परतावा देत असल्याने अनेक महिलांनी सन्मान योजनेत बचत जमा केली आहे. दोन लाख जमा केल्यास दोन वर्षांत दोन लाख ३२,०४४ रुपये मिळतील.

काय आहे महिला बचतपत्र योजना?
दोन लाखांपर्यंत महिला कितीही बचतपत्र काढू शकते. दोन खात्यांत किमान तीन महिन्यांचे अंतर असावे. वर्ष झाल्यावर खात्यातील ४० टक्के रक्कम एकदाच काढू शकता. १ हजारापासून ते २ लाख रुपये एवढी गुंतवणूक १०० च्या पटीत करता येते. चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.

पाच महिन्यांत ४२ कोटी ९६ लाख ६८३०० रुपये गुंतवले
छत्रपती संभाजीनगर शहर आणि औरंगाबाद जिल्हा परिसरात ८ हजार ३८८ महिलांनी महिला सन्मान बचत खाती उघडली आहेत. त्यांनी ४२ कोटी ९६ लाख ६८३०० रुपये गुंतवले आहेत. याचा फायदा या महिलांना होणार आहे.

८ हजार ३८८ बचत खाती, ७.५ टक्के व्याज
गुंतवणूक १००० -दोन वर्षांत ११६० रुपये
             २००००- २३२०४ रुपये
             ५०.०००- ५८०११ रुपये
             २००००० रुपयांचे २,३२०४४ रुपये मिळतील.

कोणती कागदपत्रे लागतात?
जवळच्या पोस्टात जाऊन महिला खाते उघडू शकतात. त्यासाठी आधारकार्ड, पॅन कार्डच्या सत्यप्रती (झेरॉक्स) आणि पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे लागतात.

महिलांकडून चांगला प्रतिसाद
२०२५ पर्यंत ही महिला सन्मान बचत योजना पोस्टाने आणली असून, त्यास महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद आहे. ज्या महिला वंचित राहिल्या असतील, त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

Web Title: Womens special scheme, Deposit Two Lakhs in Post; Get two lakh 32 thousand in two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.