जिल्ह्यात १६ नळ योजनांची कामे सुरू
By Admin | Published: August 25, 2016 11:39 PM2016-08-25T23:39:10+5:302016-08-25T23:40:35+5:30
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या आर्थिक वर्षात १७ ठिकाणी नळयोजनांची कामे सुरू केली असून त्यापैकी १ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या आर्थिक वर्षात १७ ठिकाणी नळयोजनांची कामे सुरू केली असून त्यापैकी १ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
या योजनासाठी एकत्रित साडेतीन कोटींचा निधी लागणार असून ही कामे आता प्रगतीत आहेत. यावर आतापर्यंत १.४२ कोटी एवढा खर्च झाला आहे.
यामध्ये औंढा तालुक्यातील टाकळगाव तर्फे शहापूर, केळी तांडा, दुघाळा, ढेगाज, पाझर तांडा, वसमत तालुक्यातील चिखली, लोण बु., सिरली, हिंगोली तालुक्यातील भिरडा, डिग्रस कऱ्हाळे, पिंपळदरी तर्फे बासंबा, पहेनी, कळमनुरी तालुक्यातील दाभडी, सेनगाव तालुक्यातील बन, वझर खु., वायचाळ पिंप्री, खुडज या गावांचा समावेश आहे.
पाणीपट्टीच्या हमीनंतरच दुरुस्ती
जिल्ह्यातील सिद्धेश्वर २३ गाव, पुरजळ २0 गाव, गाडीबोरी ८ गाव व मोरवड २५ गाव योजनेच्या दुरुस्तीसाठी ८.५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. या योजनेचे पाणी अनेक गावांत मिळत नाही. मात्र आता दुरुस्तीची संधी उपलब्ध झाल्याने अशा गावांतही पाणी जाण्याची आशा आहे. परंतु शिखर समितीतील जी गावे ७0 टक्के पाणीपट्टी भरण्याची हमी देतील, अशांनाच या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेअंतर्गतची किती गावे यात सहभागी होतील, याचा सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरु आहे.