घाटीत ४९ कर्मचा-यांची कामाला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:45 AM2017-12-13T00:45:06+5:302017-12-13T00:45:16+5:30

घाटी रुग्णालयातील तब्बल ४९ कर्मचा-यांनी महिनाभरात कामाला दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामधील १४ कर्मचारी मागील काही दिवस सतत गैरहजर आहेत. कामावर न येऊनही काहींचे वेतन अदा करण्याचा प्रकार होत असल्याचे समजते.

 Work of 49 employees in the valley, Dandi | घाटीत ४९ कर्मचा-यांची कामाला दांडी

घाटीत ४९ कर्मचा-यांची कामाला दांडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील तब्बल ४९ कर्मचा-यांनी महिनाभरात कामाला दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामधील १४ कर्मचारी मागील काही दिवस सतत गैरहजर आहेत. कामावर न येऊनही काहींचे वेतन अदा करण्याचा प्रकार होत असल्याचे समजते.
घाटी रुग्णालयात साफसफाईपासून अनेक कामांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावतात. रुग्णसंख्येमुळे कर्मचाºयांवर कामाचा प्रचंड ताण येतो. सर्व परिस्थितीला सामोरे जात कर्मचारी कामाची जबाबदारी पार पाडतात; परंतु काही कर्मचारी याला अपवाद ठरत आहेत. कोणतीही कल्पना न देता कामावर गैरहजर राहण्याचे प्रकार घडत आहे. एक दिवसापासून तर २५ ते ३० दिवसांपर्यंत सलग अनुपस्थित राहण्याचे प्रमाण आढळून येत आहे.
महिनाभरात ४९ कर्मचारी कामावर गैरहजर होते. यामध्ये १४ कर्मचारी तर सतत गैहजर राहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काही कर्मचाºयांना कामावर न येताही वेतन दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बाब घाटी प्रशासनाच्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे याविषयी कडक पाऊल उचलून कर्मचाºयांची उपस्थिती तपासली जात आहे. काही जणांच्या दबावामुळे गैरहजर कर्मचाºयांची हजेरी दाखवूनही वेतन देण्याचा प्रकार केला जातोे. दुसरीकडे काही कर्मचाºयांनी स्वत:च्या जागी बदली कर्मचारी ठेवल्याचेही समजते.
पूर्ण वेतन कपात
कर्मचाºयांची उपस्थिती ही प्राधान्याने तपासली जाते. यामध्ये गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना वेतन दिले जात नाही. ४९ कर्मचाºयांची पूर्ण वेतन कपात केली जाणार आहे. गैरहजर असूनही वेतन देण्याचा कोणताही प्रकार होत नाही.
-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय

Web Title:  Work of 49 employees in the valley, Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.