कोरोना काळात बीजेएसचे कार्य उल्लेखनीय
By | Published: December 9, 2020 04:00 AM2020-12-09T04:00:03+5:302020-12-09T04:00:03+5:30
शांतीलाल मुथा : संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ऑनलाइन औरंगाबाद : महाराष्ट्रासह चार राज्यांत कोरोना काळात भारतीय जैन संघटनेने स्वयंस्फूर्तीने उल्लेखनीय ...
शांतीलाल मुथा : संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ऑनलाइन
औरंगाबाद : महाराष्ट्रासह चार राज्यांत कोरोना काळात भारतीय जैन संघटनेने स्वयंस्फूर्तीने उल्लेखनीय काम करीत आरोग्य सेवा केली, असा गौरव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी केला.
भारतीय जैन संघटनेचे ऑनलाइन राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पार पडले. ते म्हणाले, महाराष्ट्रात १ एप्रिल ते २२ जूनदरम्यान १९१ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून १४ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ हजार १७१ कोरोना रुग्ण शोधता आले. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्येही तसेच कार्य संघटनेने केले. मिशन झीरोअंतर्गत साडेचार लाख नागरिकांची अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करून ३३ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्याशिवाय मूल्यवर्धन उपक्रमात ६७ हजार शाळा आणि १ लाख ९५ हजार शिक्षकांच्या माध्यमातून साडेचार लाख विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यात आले. प्रत्येक आपत्कालीन स्थितीत भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला. यापुढेही नव्या जोमाने काम सुरू राहील. गौतम संचेती यांनी सल्ला दिला की, संघटनेने आता समाजाची कनेक्टिव्हिटी वाढविण्याची आवश्यकता आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांचा सत्कार करण्यात आला.
अधिवेशनाला तनसुख झांबड, मिठालाल कांकरिया, मराठवाडा अध्यक्ष पारस चोरडिया, अनिल संचेती, मनीषा भन्साळी, मनोज बोरा, राहुल झांबड, प्रवीण काला, प्रकाश कोटेचा, राहुल दाशरथे आदींची उपस्थिती होती.