केळणा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:04 AM2021-01-10T04:04:41+5:302021-01-10T04:04:41+5:30
केळणा नदीवर नवीन उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा ...
केळणा नदीवर नवीन उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. पावसाळ्याचा कालावधीत लोकांची होणारी वाताहतदेखील वृत्तातून मांडण्यात आली.
या मार्गावर सिल्लोड आगाराच्या बसेस धावतात. मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. अंभई व परिसरातील गावातून सिल्लोड, कन्नडकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. जुन्या फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. तर काही जण धोकादायक प्रवास करतात. परंतु, या ठिकाणी पर्यायी रस्ता बनविण्याचे काम अवघड असल्याने वाहनधारकांना रेलगावमार्गे जावे लागते. अर्थात लाबंचा पल्ला गाठत अंभई भराडी परिसरातील लोकांना घरी जावे लागत असे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेण्यात आले आहे.
फोटो :