शिक्षण विभागाच्या कामकाजावर जि. प. सदस्यांची नाराजी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:01+5:302020-12-17T04:24:01+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या ३ सदस्यांनी बुधवारी स्थायीच्या बैठकीतून ...
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या ३ सदस्यांनी बुधवारी स्थायीच्या बैठकीतून सभात्याग केला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे तक्रारदार सदस्य केशवराव तायडे यांनी माहिती दिली.
जि. प. सदस्यांसमवेत शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी बैठक घेतली. बैठकीत चौकशी समिती नेमुन कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवूनच चौकशी करावी असा आग्रह सदस्यांनी कायम ठेवला आहे.
सुमारे अर्धा तास चाललेल्या बैठकीत सीईओंना सदस्यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी निदर्शनास आणून दिल्याचे रमेश गायकवाड म्हणाले. यावेळी रमेश पवार यांची उपस्थिती होती. मात्र, मूळ तक्रार करणारे सदस्य शिवाजी पाथ्रीकर बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनीच शिक्षण विभागातील कारभारवार स्थियीच्या बैठकीत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
गायकवाड यांनी २३ मुद्द्यांचे तर तायडे यांनी १९ मुद्द्यांचे पत्र डाॅ. गोंदावले यांना दिले असून त्या अनुशंगाने शिक्षणाधिकारी जयस्वाल यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.