सोयगावात सुटीच्या दिवशीही कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:50 AM2019-02-20T00:50:17+5:302019-02-20T00:51:02+5:30
तहसील कार्यालय सुरु : सन्मान योजनेच्या कामासाठी तब्बल ८० कर्मचारी जुंपले
सोयगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या कामामुळे मंगळवारी सुटीच्या दिवशीही तहसीलचे कामकाज सुरु होते.
पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून नावे अपलोड करण्याच्या कामासाठी मंगळवारी शिवजयंतीच्या सुटीच्या दिवशीही शासनाच्या चार विभागाच्या कर्मचाºयांनी तहसील कार्यालय गजबजून गेले होते. सुटीच्या दिवशीही तब्बल चार विभागांच्या ८० कर्मचाºयांना कामकाज करावे लागल्याने सुटी रद्द झाल्याची चर्चा होती.
सोयगाव तालुक्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. संबंधित कर्मचाºयांनी गावागावात जावून शेतकºयांचे खाते क्रमांक, आधार आणि कुटुंबाची माहिती संकलित करून ही माहिती व पात्र शेतकºयांची नावे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि सेवा संस्थांच्या सचिवांना मंगळवारी शिवजयंतीच्या सुटीच्या दिवशी तोंडी सूचनेवरून तहसील कार्यालयावर बोलाविण्यात आले होते.