वर्क फ्रॉम होमचा लठ्ठपणा वाढीला हातभार, वर्षभरात सारेच होऊ लागले गोलमटोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:15 PM2021-12-24T18:15:58+5:302021-12-24T18:16:27+5:30

शालेय विद्यार्थ्यांपासून मोठ्या व्यक्तींमध्ये स्थूलपणाची समस्या

Work from home contributes to obesity growth, in a year all are suffers from obesity | वर्क फ्रॉम होमचा लठ्ठपणा वाढीला हातभार, वर्षभरात सारेच होऊ लागले गोलमटोल !

वर्क फ्रॉम होमचा लठ्ठपणा वाढीला हातभार, वर्षभरात सारेच होऊ लागले गोलमटोल !

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना काळात अनेक दिवस घराबाहेर पडणे बंद झाले होते. ऑफिसचे कामही घरातूनच सुरू होते. यामुळे अनेकांचे वजन वाढले. परिणामी काहींचे आरोग्यही बिघडले. यातून सावरत अनेकांनी वजन पुन्हा नियंत्रणात आणले. तर काही जण अजूनही कसरत करीत आहेत.

गतवर्षी लॉकडाऊन घोषित झाले. तेव्हा कोणाचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू झाले. कोणाला दुकान बंद ठेवून घरी बसावे लागले. तर काहींना नोकरीच गमवावी लागली. या सगळ्यात वजनवाढीची समस्या वाढली. लाॅकडाऊनमुळे मुलांचे शाळेत जाणेही बंद झाले. मैदानी खेळातून मुलांचा जो काही व्यायाम होत होता, तोही बंद झाला. घरीच असल्याने सतत खाणे सुरू झाले आणि मुले लठ्ठ झाली. ही घातक गोष्ट आहे. नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वजनापेक्षा ३ ते ५ किलोंनी जात वजन वाढल्याचेही डॉक्टरांना आढळून आले.

६८ किलोवरून ८६ किलो
लाॅकडाऊनमध्ये घरीच थांबावे लागले. त्यामुळे माझे वजन ६८ किलोवरून ८६ किलोपर्यंत वाढले. शरीराचा आकारच बिघडून गेला होता. त्यानंतर प्रकृती खराब झाली होती; पण आता ६३ किलो वजन आहे.
- शंकर बखळे

१२ किलो वजन वाढले
माझे १२ किलो वजन वाढले होते. आता नियमितपणे व्यायाम करतो व सकाळी फिरतो. त्यामुळे आता वजन नियंत्रणात आहे.
- रियाज खान जब्बार खान

१० किलो वजन वाढले
लाॅकडाऊन लागल्यानंतर घरूनच काम करावे लागले. त्यामुळे १० किलो वजन वाढले. आता व्यायाम सुरू करण्याचा विचार आहे.
- एक महिला

आता वजन कमी कसे करणार?
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, शारीरिक रचना आणि क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास प्राधान्य दिला पाहिजे. पायी चालणे वा सायकलिंग, योगा करणे फायद्याचे ठरते. कोणत्याही व्यायामाची सुरुवात एकदम करता कामा नये. हळूहळू सुरुवात करावी. सरावानंतर प्रमाण वाढवावे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा. त्याबरोबर सकस आहार घ्यावा.

व्यायामासह आहार महत्त्वाचा
बैठे काम करावे लागत असेल अधूनमधून फिरले पाहिजे. सकाळच्या वेळी किमान ५० मिनिटे ते एक तास फिरले पाहिजे. खाण्यावर नियंत्रण पाहिजे. जंक फूड टाळा. कमी कॅलरी असलेले परंतु व्हिटॅमिन असलेले पदार्थ सेवन करून तेलकट पदार्थ टाळावेत.
- डाॅ. प्रभाकर जिरवणकर, प्राध्यापक, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी.

Web Title: Work from home contributes to obesity growth, in a year all are suffers from obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.