नगर पालिकांचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:41 AM2017-08-10T02:41:05+5:302017-08-10T02:43:44+5:30
राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला. जिल्ह्यातील १३ नगर परिषद आणि ६ नगर पंचायतीच्या सर्वच कर्मचाºयांनी एका दिवसाची सामूहिक रजा घेतल्याने नगर परिषद व पंचायतीचे कामकाज ठप्प झाले. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाºयांनी पालिकेसमोर धरणे देत शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध केला. बुधवारी सामूहिक रजा आणि १० ते १४ आॅगस्टपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. त्यानंतरही शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय नगर परिषद मुख्याधिकारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उमरेड, रामटेक, काटोल, कामठी, मोवाड, सावनेर, खापा, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, मौदा, वानाडोंगरी, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, कन्हान, महादुला आदी नगर परिषद, नगर पंचायतमधील कर्मचाºयांनी बुधवारी या आंदोलनात सहभाग घेत लाक्षणिक संप पुकारला.
हिंगणा नगर पंचायत तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजेवर गेल्याने दोन्ही कार्यालय बुधवारी दिवसभर बंद होते. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. या आंदोलनात हिंगणा नगरपंचायतचे गणेश पात्रे, अमोल घोडमारे, संजय माहुरे, चैतन्य डाहे तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे किरण रोगे, हरिश्चंद्र बारंगे, देवेंद्र शेंडे, देवीदास बेलेकर, उमेंद्र किन्हेकर, कुमुद सोनटक्के, लीलाधर डाखळे, सोनाली राऊत, सोनाली सोमनाथे आदी सहभागी झाले होते.
वाडीत नगराध्यक्षांना निवेदन
वाडी नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारून आपल्या प्रलंबित मागण्यासंदर्भात नगराध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले. यावेळी कर्मचाºयांनी मुख्याधिकारी राजेश भगत, भद्रावतीचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या उपस्थितीत पालिकेसमोर धरणे दिली. यावेळी उपमुख्याधिकारी आकाश सहारे, संघटन अध्यक्ष रमेश इखनकर, लेखा अधिकारी शरद करवाडे, प्रणाली दुधबळे, अभियंता प्रमोद माने, अश्वलेषा भगत, बी. पी. निकाजू, योगेश जहागीरदार, धनंजय गोतमारे, अविनाश चौधरी, कपील डाफे, लक्ष्मण ढोरे, रमेश इखनकर, कमलेश तिजारे , संदीप अढाऊ, भारत ढोके, रवींद्र रडके, एम. एम. वानखडे आदी उपस्थित होते. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कर्मचाºयांनी दिला.