जालना रोडच्या पॅचवर्कचे काम अखेर सुरू
By Admin | Published: September 21, 2016 12:08 AM2016-09-21T00:08:16+5:302016-09-21T00:19:04+5:30
औरंगाबाद : जालना रोडवर ३ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेले डांबरी सरफेसिंग यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून खडीचा कच रस्त्यावर साचला.
औरंगाबाद : जालना रोडवर ३ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेले डांबरी सरफेसिंग यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून खडीचा कच रस्त्यावर साचला. त्या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी म्हणून डांबरी पॅचवर्क बांधकाम विभागाने सोमवारपासून सुरू केले आहे. लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. सेव्हन हिल ते अग्रसेन चौकापर्यंतचे काम विभागाने हाती घेतले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महापालिका रस्ते चांगले असावेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे. शहरातील सुमारे १३५० कि़मी. रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामध्ये १२५ कि़मी.चे रस्ते विकास आराखड्यातील आहेत आणि २१ कि़मी. चे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे असून त्या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. नगरनाका ते विमानतळ (बाबा पेट्रोलपंप ते क्रांतीचौक वगळून) ९ कि़मी., सिडको ते हर्सूल टी पॉइंट ५ कि़मी. व हर्सूल ते दिल्लीगेटपर्यंत २.५ कि़मी. पंचवटी चौक ते छावणी लोखंडी पूल अर्धा कि़मी. व नगरनाका ते गोलवाडीपर्यंत २.५ कि़मी. पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण २१ कोटींच्या निधीतून जून २०१४ मध्ये झाले होते. यातील जालना रोड हा सर्वात जास्त निधी मिळालेला रस्ता होता. ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; परंतु तेवढा निधी आला नाही. बांधकाम विभागाच्या शहरातील २१ कि़मी. रस्त्यांसाठी २०१३ मध्ये २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.