‘साई’ केंद्राच्या अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम प्रगतिपथाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:41 PM2018-04-29T18:41:53+5:302018-04-29T18:43:09+5:30

‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील आॅलिम्पिक दर्जाच्या व अत्याधुनिक सुविधांयुक्त असणाऱ्या स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फमुळे ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडली आहे. मराठवाड्याची शान ठरणाºया स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीच्या मैदानाचे उद्घाटन मे महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेला अत्याधुनिक सुविधांयुक्त स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

The work of 'Sai' Center's state-of-the-art swimming pool is in progress | ‘साई’ केंद्राच्या अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम प्रगतिपथाकडे

‘साई’ केंद्राच्या अत्याधुनिक जलतरण तलावाचे काम प्रगतिपथाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देउद्घाटन सोहळा मे महिन्यात : अ‍ॅस्ट्रोटर्फ, स्विमिंगपूलमुळे ऐतिहासिक शहराच्या वैभवात पडणार भर

जयंत कुलकर्णी ।
औरंगाबाद : ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील आॅलिम्पिक दर्जाच्या व अत्याधुनिक सुविधांयुक्त असणाऱ्या स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फमुळे ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडली आहे. मराठवाड्याची शान ठरणाºया स्विमिंगपूल आणि अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीच्या मैदानाचे उद्घाटन मे महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.
विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेला अत्याधुनिक सुविधांयुक्त स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांच्या पुढाकारामुळे या ९ कोटी रुपयेचा खर्च असणाºया अद्ययावत सुविधांयुक्त जलतरण तलावाच्या कामास गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ झाला. रिओ आॅलिम्पिकच्या धर्तीवर असणारा व स्टेनलेस स्टीलचा भारतातील सर्वांत पहिला स्विमिंगपूल हा ५० बाय २५ मीटर आणि १० लेनचा आहे. याची खोली ही सव्वासहा फूट इतकी आहे. विशेष म्हणजे या स्विमिंगपूलच्या लेनमध्ये थोडीदेखील चूक होत
नाही.
या स्विमिंगपूलच्या फिल्ट्रेशन प्लांटचे कामदेखील झाले असून, त्यामुळे खराब पाणी तात्काळ स्वच्छ होते. स्विमिंगपूलसाठी ६० फूट खोलीच्या विहिरीचे कामही सुरू आहे. विशेष म्हणजे स्विमिंगपूलच्या चारही बाजूंना झाडे लावणार असून भिंतीची सजावटही केली जाणार आहे.
स्विमिंगपूलच्या आवारातच जीम रूम, योगा हॉल, अडीच लाख लिटर क्षमतेचा बॅलन्सिंग टँक, चेंजिंग रुम्स असणार आहे. व्हीआयपी लोकांसाठीही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे, असे या स्विमिंगपूलचे काम पाहणाºया शासनाच्या नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉपोर्रेशनचे अभियंता दिनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
उद्घाटनाला राज्यवर्धनसिंह राठोड येणार?
अत्याधुनिक सुविधांयुक्त अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकीचे मैदान आणि स्विमिंगपूलचे उद्घाटन मे महिन्यात करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री आणि आॅलिम्पिकमध्ये देशाला नेमबाजीत रौप्यपदक जिंकून देणारे राज्यवर्धनसिंह राठोड तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुव्हेबल असणार प्रेक्षागृह
१५०० जणांची क्षमता असणारे इलेक्ट्रॉनिक बटनाद्वारे कोणत्याही स्थळी हलवू शकणारे टी बॉक्स सीटिंग अ‍ॅरेंज प्रेक्षागृहही उभारले जाणार आहे. त्यासाठी १.३ कोटी रुपयांचा खर्च असणार आहे.
त्याचप्रमाणे अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान प्रेक्षणीय आणि सुंदर दिसावे तसेच थकलेल्या खेळाडूंना रिलॅक्स होण्यासाठी मदत व्हावी यासाठी १५०० झाडे लावण्यात आली आहेत, असे वीरेंद्र भांडारकर म्हणाले.
अत्याधुनिक सुविधांमुळे स्विमिंगपूल वर्षात एकदाच रिसायकलिंग करावे लागणार आहे. तसेच स्विमिंगपूलचे पाणी निळे राहणार आहे.

Web Title: The work of 'Sai' Center's state-of-the-art swimming pool is in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :