शिऊर ते नांदगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:04 AM2021-05-30T04:04:21+5:302021-05-30T04:04:21+5:30
वैजापूर : शहरातून जाणाऱ्या नांदगाव ते शिऊर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नागरिकांचा ...
वैजापूर : शहरातून जाणाऱ्या नांदगाव ते शिऊर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नागरिकांचा खडतर प्रवास थांबणार असून, दिलासादायक चित्र नागरिकांत निर्माण झाले आहे.
तालुक्यातील येवला रोडवरील नांदगाव ते शिऊर या २९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिंमेटीकरण कामास १२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, पाण्याच्या कारणामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे (७५२ एच) नव्याने सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले. यावरून ९८ कोटी रुपयांच्या डांबरीकरण कामास नव्याने मान्यता देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या कामास सुरुवात झाली. मात्र, शहरातून जाणारा हा रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय बनला होता. त्यातच सुधारित मान्यतेसाठी अनेक महिने हे काम रखडले. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्ता व धुळीला सामोरे जावे लागले. दोन वर्षे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अखेर हे काम पूर्णत्वास जात असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहेत. शहरात दुभाजक, नाली कामे, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, पूल व झाडे लावण्याची कामे केली जात आहेत, असे बांधकाम कंपनीचे धनंजय सातपुते यांनी सांगितले.
--
फोटो : शहरात गुळगुळीत रस्ते.