वाळूज एमआयडीसीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 07:12 PM2018-12-10T19:12:16+5:302018-12-10T19:13:42+5:30

वाळूज एमआयडीसीत खाजगी कंपनीच्या मदतीने कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे.

Work of the waste processing project in the waluj | वाळूज एमआयडीसीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

वाळूज एमआयडीसीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत खाजगी कंपनीच्या मदतीने कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या प्रकल्पासाठी जवळपास १७ कोटींचा निधी खर्च होणार असून, आजघडीला या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्चअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


वाळूज उद्योगनगरी, बजाजनगरसह भागातील ग्रामपंचायत हद्दीत जमा होणाºया कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी उद्योजक संघटना व स्थानिक ग्रामपंचायतींकडून एमआयडीसी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. कचºयाचा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून वर्षभरापूर्वी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

नऊ महिन्यांपूर्वी याचे भूमिपूजन करण्यात आले होते. या प्रकल्पात संबधित कंपनीकडून परिसरातील ओला व सुका कचरा गोळा करुन या कचºयावर प्रकिया करुन बायोगॅस व सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी १६ कोटी ७० लाख रुपये खर्च होणार असून, एमआयडीसी प्रशासनाकडून प्रकल्पासाठी ३ हेक्टर १८ गुंठे जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उद्योगनगरीत मायलॉन कंपनीसमोर भूखंड क्रमांक पी.-१८३ या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया करुन सेंद्रिय खत व सीएनजीची गॅस निर्मिती केली जाणार आहे. संबधित कंपनीकडून औद्योगिक परिसर व नागरी वसाहतीत ठिक-ठिकाणी गोळा होणारा कचरा वाहनांद्वारे संकलित केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक उद्योजक व नागरिकांकडून कुठलेही मोफत कचरा संकलन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रात तसेच नागरी वसाहती स्वच्छ होण्यास मदत मिळणार आहे.


प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण
वाळूज एमआयडीसीतीत महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पात उद्योगनरीतील १५ मेट्रिक टन व नागरी वसाहतीतील १६ मेट्रिक टन अशा ३१ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता सुधीर सुत्रावे यांनी दिली.


कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती
परिसरातील उद्योजक, व्यवसायिक व नागरिकांत ओला व सुका कचरा वेग-वेगळा कसा ठेवावा, यासाठी परिसरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी एमआयडीसीकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

Web Title: Work of the waste processing project in the waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.