कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

By साहेबराव हिवराळे | Published: January 5, 2024 04:55 PM2024-01-05T16:55:48+5:302024-01-05T16:56:41+5:30

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत.

Workers' children got for progress; When will Mathuranagar- Sambhaji Colony be freed from pollution? | कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-६ परिसरातील मथुरानगर, संभाजी कॉलनी कामगार कुटुंबियासाठीची वसाहत आहे. त्या ठिकाणी कौटुंबिक गरजेनुसार राहण्याची सुविधा झाली परंतू मुलभूत गरजा सिडकोतून मनपात आल्यानंतर फारशा प्रमाणात प्रामुख्याने सोडविल्या नाहीत. कामगारांची मुलं डॉक्टर,वकील, इंजिनिअर, बँक तसेच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत.

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. परंतु, अस्वच्छतेतून कधी उजाडणार मथुरानगर- संभाजी काॅलनीची पहाट अशी अवस्था आहे. सिडकोत असताना येथील नागरिकांना सिडको सेवासुविधा देत होती. आता मनपाकडे हस्तांतरण झाल्यावर सेवासुविधा देण्याची जबाबदारी आहे. परंतु त्या काळात टाकलेल्या ड्रेेनेज लाईनवरच वाढलेल्या कुटुंबाचा भार आहे. त्यामुळे मथुरानगरात ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रकार दिवसाआड बघायला मिळतात. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही त्याचे निराकरण होत नाही. कचरा गाड्या घरापर्यंत येऊन कचरा घेऊन जाणार असा नियम असतानाही गाड्या सरळ रस्त्याने निघून जातात अन् त्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानावर टाकून निघून जातात. परंतु जेव्हा घरी ये-जा करताना अनेकदा नाक दाबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

औषध फवारणी करणाऱ्यांचाही फेरफटका येथे दिसत नाही, त्यामुळे डासाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. परिसराची भौगोलिक रचना टेकडीची असल्याने घराची उंची समान दिसत नाही. असे विविध प्रश्न नागरिकांचा पाठलाग सोडत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

उद्यानात दारूड्यांची भीती
मथुरानगर व संभाजी कॉलनीच्यालगत असलेल्या भव्य-दिव्य उद्यान सिडकोने हस्तांतर केले. मात्र, त्याची दुरावस्था झाली आहे.

उद्यानात सुरक्षा महत्वाची
उद्यानात बोअरवेल पेव्हर ब्लॉक, जाॅगिंगसाठीची तयारी असली तरी येथे दारूच्या रिकाम्या बाटली अन् दारूड्याचा आश्रय असल्याने येथे इतरांंना चांगल्या कामासाठी वापर करणे शक्य होत नाही.
- मनिष नरवडे

कचऱ्याची विल्हेवाट लावावी
सुंदर शहर स्वच्छ शहर ही घंटा गाडीवरील गीत ऐकून शहर कचरा मुक्त होणार, अशी आशा बळावली होती. परंतु गाड्या घरापर्यंत येऊन कचरा नेत नाहीत. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास किती दिवस सहन करावा.
-कुणाल परदेशी

रस्त्यावर ड्रेनेजचे पाट कधी थांबणार?
जुन्याच ड्रेनेज लाइन असल्याने त्यावर अधिकचा भार पडत आहे. पावसाळ्यात तर रस्ते ओलेच असले तर समजून घेता येते; परंतु हिवाळा आणि उन्हाळ्यातही ड्रेनेज चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. जुन्या लाइन बदलून नवीन लाइन टाकण्याची गरज आहे.
- कृष्णा नरवडे

अंतर्गत रस्ते सुधार कधी?
मुख्य रस्ते गुळगुळीत केलेले आहेत. परंतु, अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावरून घर गाठताना ओबडधोबड रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते आणि नागरिकांना पाठदुखीचा ही आजार जडत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी आहे.
- आकाश साबळे

बिघडलेल्या बोअरवेल सुधारा
सिडको एन-६ परिसरात लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या वतीने बोअरवेल टाकण्यात आलेले आहेत. परंतु, त्यापैकी जुन्या मनपाच्या शाळेतील बोअरवेल फक्त सुरू असून, त्याचा जनतेला काही फायदा नाही. इतर बोअरवेल बिघडलेले असताना मनपाच्या टंचाईत ते मनपाने दुरुस्ती केलेले नाही.
- किरण पाटील शिरवत 

Web Title: Workers' children got for progress; When will Mathuranagar- Sambhaji Colony be freed from pollution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.