कोरोनाने मृत्यू झाल्यास कामगारांना दोन लाख मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:02 AM2021-05-16T04:02:56+5:302021-05-16T04:02:56+5:30
१ एप्रिल २०२० पासून ज्या बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रांचे नूतनीकरण करण्याची मुदत संपली आहे, अशा कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्यास ...
१ एप्रिल २०२० पासून ज्या बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रांचे नूतनीकरण करण्याची मुदत संपली आहे, अशा कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्यास किंवा अन्य कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना कल्याणकारी मंडळाचे सर्व लाभ देण्यात यावेत, ही मूळ मागणी होती. त्यामुळे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ज्या नोंदीत कामगारांचा मृत्यू झालेला आहे, अशा कामगारांपैकी ज्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये व नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळतील. कामगारांना लाभ देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे तथा इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. मधुकर खिल्लारे यांनी केले आहे.