अधिकाऱ्यांच्या मनमर्जीत अडकली पोखरा योजनेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:51+5:302021-04-24T04:04:51+5:30

लाडसावंगी : परिसरातील गावात पोखरा योजनेंतर्गत मिळणाऱ्या शेतीसंबंधीच्या योजना केवळ कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रखडल्या असल्याचे चित्र आहे. ...

Works of Pokhara scheme stuck in the minds of officials | अधिकाऱ्यांच्या मनमर्जीत अडकली पोखरा योजनेची कामे

अधिकाऱ्यांच्या मनमर्जीत अडकली पोखरा योजनेची कामे

googlenewsNext

लाडसावंगी : परिसरातील गावात पोखरा योजनेंतर्गत मिळणाऱ्या शेतीसंबंधीच्या योजना केवळ कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रखडल्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हैराण आहे.

लाडसावंगी भागातील आलमपूर, रुस्तमपूर या गावात पोखरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेड नेट, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळे व त्याचे अस्तरीकरण आदी कामांची मंजुरी मिळाली, परंतु कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यामुळेच लाभार्थी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.

योजनेच्या लाभासाठी शेतकरी कार्यालयात चकरा मारतात, पण अधिकारी कर्मचाऱ्यांचा भेट होत नाही. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसादही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात शेती हंगाम जवळ आल्याने, लागवडपूर्वी शेती मशागत करत शेततळे तयार करणे, ठिंबक सिंचन मंजूर करण्यासाठी कृषी सहायक हजर लागतात, पण ते गेल्या काही दिवसांपासून गावात येत नसल्याने अडचणी येत आहे. लॉकडाऊनचा काळ असला, तरी शेतीसंबंधीची कामे करण्यास परवानगी आहे. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नसल्याची स्थिती आहे. ऐन पेरणी काळात लागवड करायची की, पोखरा योजनेतील शेततळ्याचे कामे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी बंडू पडूळ, गजानन पडूळ, जगन्नाथ पडूळ, हाकीम शेख, अजय पडूळ आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

---- कोट -----

पोखरा योजनेंतर्गत माझे शेड नेट मंजूर झाले आहे. यासंबंधी कामे करण्याची परवानगीही मिळाली, परंतु गेल्या महिन्याभरापासून संबंधित कृषी सहायक यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने अडचणी येत आहे. त्यांना वारंवार फोन लावत असूनही ते घेत नसल्याची स्थित आहे.

-- बंडू पडूळ, शेतकरी रुस्तमपूर

Web Title: Works of Pokhara scheme stuck in the minds of officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.