वाळूजमध्ये उद्योगांच्या संधींवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 09:13 PM2019-09-07T21:13:44+5:302019-09-07T21:13:50+5:30
जर्मनीत उद्योग सुरु करण्याचे आवाहन
वाळूज महानगर : वाळूज येथील मसिआ कार्यालयात गुरुवारी (दि.५) मसिआ व जीआयझेड संयुक्त विद्यमाने जर्मनी देशातील उद्योगाच्या संधी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जर्मनीच्या आयरिस बेकर, जीआयझेडचे तसवर अली तर प्रमुख पाहुणे म्हणून मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, उपाध्यक्ष अभय हंचनाळ, नारायण पवार, सचिव मनीक अग्रवाल, अर्जुन गायकवाड उपस्थित होते. या प्रसंगी बेकर यांनी जर्मनीतील उद्योगाविषयी माहिती देऊन भारतीय उद्योजकांना जर्मनीत विविध उद्योग करण्याची चांगली संधी असल्याचे सांगितले.
जर्मन सरकारकडून उद्योग सुरु करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असून , भारतीय उद्योजकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात ज्ञानदेश राजळे यांनी जीआयझेड व मसिआच्यावतीने आयोजित अभ्यास दौऱ्याची माहिती उद्योजकांनी दिली. जर्मनीत उद्योग सुरु करण्यासाठी या परिसरातील उद्योजकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अभय हंचनाळ यांनी पॉवर प्रझेटेंशनद्वारे अभ्यास दौºयातील प्रसंग व माहिती स्थानिक उद्योजकांना दिली. या अभ्यास दौºयाच्या संपुर्ण प्रवासावर एक माहितीपर पुस्तीका प्रकाशित करण्यात आली असून याचे बेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यशाळेत राज्यातील सुक्षम, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी जर्मन सरकारच्या मदतीने नागपूर येथे सुरु केलेल्या प्रकल्पाची माहिती उद्योजकांना देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यशाळेला माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, सचिन गायके, राहुल मोगले, विकास पाटील, अब्दुल शेख, अनिल पाटील, सर्जेराव साळुंके, रविंद्र कोंडेकर, विनय राठी, किरण जगताप, अजय गांधी, अंकुश लामतुरे, दिलीप शिंदे, पी.ए.शाह, गजानन देशमुख आदीसह मसिआच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.