दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी होणार कार्यशाळा

By Admin | Published: May 15, 2014 12:09 AM2014-05-15T00:09:42+5:302014-05-15T00:27:01+5:30

औरंगाबाद : लोकमत व कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘फलश्रुती २०१४’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Workshops to be held on Sunday for parents, students for Class-X | दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी होणार कार्यशाळा

दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी रविवारी होणार कार्यशाळा

googlenewsNext

 औरंगाबाद : लोकमत व कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘फलश्रुती २०१४’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा रविवार, दि.१८ मे रोजी लोकमत भवन येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत कॉम्पिटिशन पॉइंटचे प्रा. राजन वाळवे ‘बदलते शैक्षणिक धोरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रा. जय ‘करिअरच्या विविध संधी’ यासंदर्भात, तर संतोष कारले ‘करिअर कौन्सलर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बोर्डाचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षा यांच्यात योग्य सांगड कशी घालावी याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड तणावात वावरत असतात. जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स आयआयटी, एनआयटी, पीएमटी, एआयआयएमएस, एसएटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. वाढती स्पर्धा आणि उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. या इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली, तर यश आपल्याच मुठीत असते. स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जाता येईल, यासंदर्भात जाणून घेण्यासाठीचे लोकमतने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आहे. विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लोकमत भवन अथवा ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Workshops to be held on Sunday for parents, students for Class-X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.